व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 14 September 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची निवड 19 सप्टेंबर रोजी लॉटरी पद्धतीने होणार*


नांदेड दि.  :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय नांदेड मार्फत सुविधा कर्ज योजना (एनएसएफडीसी) 5 लाख व महिला समृध्दी (एमएसवाय) 1.40 लाख या योजनेचे कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यात आले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड गुरूवार 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. ग्यानमाता शाळेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिट्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) होणार आहे.  

या कर्ज प्रकरणांची ईश्वरी चिट्ठी (लॉटरी) द्वारे निवड करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा ईश्वर चिट्ठी समितीचे अध्यक्ष यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिट्ठीव्दारे (लॉटरी पद्धतीने) ही निवड करण्यात येणार आहे. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. पात्र अर्जदारांची यादी या महामंडळ कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) नांदेड यांनी केले आहे. 
0000

No comments:

Post a Comment