मुदखेड/प्रतिनिधी :- तालुक्यातील मौजे पिंपळकौठा चोर येथील आपल्या शेतामध्ये काम करून घरी येत असतांना ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या हजेरीत कॅनॉल लगत अंगावर अचानक वीज पडून दत्ता दिगांबर वाघमारे या २२ वर्षीय तरुण शेतकरी पुत्राचा हृदयद्रावक जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत माजी जि.प.सदस्या सौ.अरुणाताई कल्याणे यांचे प्रतिनिधी भा.च.स.साखर कारखान्याचे माजी संंचालक भीमराव पा.कल्याणे, पत्रकार संजय कोलते यांनी महसूल प्रशासनास सदर घटनेची माहिती दिली.
११ फेब्रुवारी रोजी ३ नंतर शहर व तालुक्यात काही ठिकाणी विजेच्या कडकाडाटासह गाराचा अवकाळी पाऊसाने धुमाकूळ घातला, यामध्ये शेती-पिकांसह शेतकऱ्यांचे अन्य नुकसान देखील झाले. कोल्हा, मेंडका, वाई, वरदडा यासह तालुक्यातील अन्य काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचे समजते.
या घटनेबाबत तहसीलदार मुगाजी काकडे यांनी सामाजिक जाणीवेच्या भूमिकेतून तातडीने सूत्रे हलवित पोलीस प्रशासनाला माहिती कळवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे व त्यांचे अन्य सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.
दरम्यान, वीज पडून मृत्यू झालेल्या दुर्घटनेतील शेतकरी पुत्राच्या कुटुंबास शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी यानिमित्ताने केल्या जात आहे.
No comments:
Post a Comment