गेल्या चार वर्षापासून नागपूर नांदेड तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे 361 चे काम वारंगा ते महागाव असे चालू आहे अद्याप या रोडचे पूर्ण काम झाले नसून काम मात्र पूर्णपणे संत गतीने सुरू आहे पहिले काम सदभाव कंपनीने घेतले होते आणि आता त्यानंतर न्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे या कंपनीचा मात्र खूप भोगळ कारभार समोर येताना दिसत आहे.
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सिबदरा येथे शेतकरी विलास काळे यांच्या शेताजवळील या महामार्गावर एक पाईप पूल असून या फुलामधून सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून आलेले पाणी शिबदरा येथील नाल्याला जात असते. राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना सध्या लाखो रुपयांचं सिमेंट काँक्रीटचे मटरेल या पुलामध्ये टाकण्यात आले आहे या शेतकऱ्याचा असं म्हणणं आहे की शेतीतील पाणी या पुलामधून जात असते या पुलामध्ये सिमेंट काँक्रेटचा माल राष्ट्रीय महामार्ग वाल्यांनी फेकून दिला आहे आणि ते फुल पूर्णपणे सिमेंट काँक्रीटच्या मालाने पूर्ण पणे बुजून गेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे पावसाळ्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान होणार आहे . राष्ट्रीय महामार्गाचा भोगळ कारभार मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे लाखो रुपयांचे मटरेल फेकून देत आहेत यामुळे सरकारच्या मालमत्तेचा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत याकडे प्रशासन वेळोवेळी लक्ष देऊन कारवाई करेल का हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहे. पाहूया येथील शेतकरी काय म्हणाले
No comments:
Post a Comment