व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 4 January 2024

खा. चिखलीकर यांचे टीकाकारांना कामातून उत्तर : नांदेड -बिदर रेल्वे मार्गासाठी 750 कोटी रुपये मंजूर



      नांदेड : अवघ्या पाच वर्षात नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेचे जाळे विणण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेली कामगिरी हे आतापर्यंतच्या नांदेड जिल्ह्यातील राजकारण्यांच्या कामगिरीतील अतुलनीय अशी कामगिरी राहिली आहे . त्यामुळे टीकाकारांनी खा. चिखलीकरांवर निष्क्रियतेची टीका केली असली तरी त्या टीकेला कामातून उत्तर देत नांदेड - बिदर हा रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. त्यासाठी आता राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये 750 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे टीकाकारांनी आपली पत आणि ऐपत तपासून पहावी असा उपरोधिक सल्ला विरोधकांना दिला आहे.

        नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्वप्रथम  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नांदेड - बिदर या रेल्वे मार्गाचा प्रश्न लावून धरला. आणि या मार्गाला मंजुरी मिळवून घेतली. शिवाय पिंक बुक मध्ये नोंद केली . त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती . केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने त्यांचा पन्नास टक्के वाटा उचलणे आवश्यक होते मात्र महाविकास आघाडीच्या दळभद्री सरकारने या मार्गासाठी एक छदामही दिला नव्हता. अडीच वर्ष नांदेडचे नेते मंत्रिमंडळात मोठे मंत्री असतानाही राज्य सरकारकडून त्यांना या मार्गासाठी एकही रुपया मंजूर करून घेता आला नव्हता. संबंधित मंत्री आणि त्यांची मेहुने राज्यात आणि केंद्रात अनेक वर्ष सत्तेत असतानाही त्यांना नांदेड - देगलूर- बिदर मार्गासाठी तोडगा काढता आला नव्हता. केवळ निवेदन देण्यापलीकडे त्यांना काहीही करता आले नव्हते. राज्यात आणि केंद्रातही त्यांचे सरकार होते मात्र हा प्रश्न त्यांना प्राधान्य देऊन सोडवून घेता आला नाही. त्यामुळे आम्ही करतो ते काम सर्वश्रेष्ठ आहे हा उरबडवेपणा  केविलवाना आहे. शिवाय भाडोत्री कार्यकर्त्यांकडून बिनकामाची टीका टिप्पणी करायचे आणि जनमानसात संभ्रम निर्माण करायचा हा त्यांचा जुनाच स्वभाव आहे. एकीकडे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात विकासाची असंख्य कामे खेचून आणली आहेत. नांदेडहून नांदेड - मुंबई, नांदेड- पुणे, नांदेड - दिल्ली, नांदेड - तिरुपती या मार्गावरील रेल्वे वाढल्या. किंबहुना नांदेडहून 72 रेल्वे या मार्गातून धावत आहेत. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वर्षाचा कालावधी तर लॉकडाऊन मध्ये गेला होता. उर्वरित तीन वर्षाच्या कालावधीत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी थेट केंद्र सरकारचे नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी लक्ष वेधले. एवढेच नाही तर मराठा आरक्षणाचा मुद्दा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. यापूर्वीच्या नेत्यांना मराठा आरक्षण देण्याच्या ज्या उपसमितीचे अध्यक्ष करण्यात आले होते त्या उप समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी मराठा समाजाला अक्षरशः झुलत ठेवले. समाजाशी गद्दारी केली. परिणामी मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. याची जाणीव त्यांच्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी ठेवायला हवी. 'नाचता येणा अंगण वाकडे' या म्हणी प्रमाणे ज्यांना सिनेमात नाचता आले नाही ना  आपल्या कारकिर्दीत लोकसेवक म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही ते आता महानायक होऊ पाहत आहे. इतरांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. अशी कोपरखळी ही या निमित्ताने मारण्यात आले आहे.

       ज्यांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात तीस ते चाळीस वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्यांनी केलेली कामे नगण्य आहेत. 40 वर्षाच्या कालावधीतही नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू शकले नाहीत. ज्या पुण्याईने नांदेड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये शंकरावजी चव्हाण यांनी धरणं उभारलित त्या शंकररावजी चव्हाण यांचा आम्हाला नितांत आदर कायम राहिला आहे. मात्र शंकरराव चव्हाण यांच्या नावावरती आयुष्यभर मतासाठी झोळी पसरून, लबाड्या लाथड्या करून मागत आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा जो केविलवाना प्रयत्न करण्यात आला तो प्रयत्न नांदेड करणारा चांगलाच माहित आहे. गुरुता गदिच्या काळातही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वामुळे नांदेडला निधी मिळाला होता. गुरुतागदीच्या काळातील निधीचा आपण कुठे आणि कसा विनियोग केला याची नांदेडकरांना चांगलीच माहिती आहे. गैर व्यवहाराचा आणि भ्रष्टाचाराचा आपण  जो आदर्श महाराष्ट्रात घालून दिला आहे तो आदर्श उभ्या महाराष्ट्राने डोळ्यांनी पाहिला आहे. आपण मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार होताना कोणती दिवे लावलेत हे नांदेडकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे आपल्या किरायाच्या कार्यकर्त्यांना या सर्व बाबींची आपण जाणीव करून द्यायला हवी होती. असा उपरोधिक सल्लाही या निमित्ताने भाजपाने विरोधकांना दिला आहे.

        दरम्यान नांदेड - बिदर रेल्वे मार्गाला राज्य सरकारने आपला वाटा म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली केली होती. शिवाय यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने नांदेड - बिदर रेल्वे मार्गासाठी आजच्या कॅबिनेट मंत्राच्या बैठकीत तब्बल 750 कोटी रुपये मंजूर केले आहेत . हा निधी मंजूर करण्यात आल्याने नांदेड - बिदर रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला लवकरच सुरुवात होईल आणि गेल्या 40 वर्षाची ही मागणी पूर्ण होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

पंतप्रधानांसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे यांचे खासदार चिखलीकर यांनी मानले आभार

 नांदेड - बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून भिजत पडला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा.चिखलीकर यांना यश आले. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव , केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून या मार्गासाठी मंजुरी मिळून घेतली. त्यानंतर राज्य सरकारकडून आवश्यक असणारा निधीही उपलब्ध करून घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment