व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 13 September 2023

LPG Cylinder : 75 लाख मोफत गॅस कनेक्शन! मोदी सरकारकडून मोठी भेट

 

केंद्र सरकारने देशातील 75 लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. या योजनेतंर्गत महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होती. 
 

सरसकट 200 रुपयांची सवलत दिली. तर उज्ज्वला योजनेतर्गंत 400 रुपयांची सवलत देण्यात आली. केंद्र सरकारने आता देशातील 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही आनंदवार्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. पुढील तीन आर्थिक वर्षांत गॅस सिलेंडरची जोडणी करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत या महिलांना लाभ मिळणार आहे.

No comments:

Post a Comment