व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 13 September 2023

सुट्टीवर आलेल्या जवानाकडून गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून पतीने केली हत्या

सुट्टीवर आलेल्या जवानाकडून  गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून पतीने केली हत्या
हत्ते नंतर स्वतः गाठले पोलीस स्टेशन माळाकोळी परिसरात तील चित्त थरारक प्रकार
:- गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून पतीने हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीये. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कंधार तालुक्यातील बोरी येथे हे हत्याकांड घडले. आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थान मधील बिकानेर मध्ये तो नियुक्त आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नी आणि चार वर्षाची मुलगी सरस्वती दोघे झोपेत असताना त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीने माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती.दरम्यान पहिली मुलगी का झाली आणि माहेरून प्लॉट साठी पैसे घेऊन ये म्हणत पतीने आपल्या पत्नीची आणि मुलीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलीय. या घटने बाबत पोलीस अधिक तपास करताहेत. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या झाल्याने माळाकोळी परिसरात खळबळ उडालीये.



भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला एकनाथ जायभाये यांची नियुक्ती हे राजस्थान मधील बिकानेर येथे सैन्य दलात नियुक्ती आहे ते सध्या सुट्टीवर आले असता दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी गरोदर पत्नी भाग्यश्री व चार र्वर्षाची मुलगी सरस्वती हे दोघेही झोपेत असताना त्यांचा गळा आवळून एकनाथ जायभाये यांनी हत्या केली पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्याची गरोदर होती पत्नी आणि मुलीची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आरोपी एकनाथ जायभाये हे स्वत: पोलिस स्टेशन मधे हजर झाला आरोपीने माहिती दिल्यावर पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली मयत कुटुंबाच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केली दरम्यान हत्या करणारे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही पोलीस याबाबत अधिक तपास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या झाल्याने माळाकोळी परिसरात एकच खळबळ उडाली

No comments:

Post a Comment