नांदेड दि. 18 -
राज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी नोकर भरण्यासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढून राज्यात बेकारी वाढवण्याचा घाट घातला असून या कंत्राटी धोरणाच्या विरोधात राज्य सरकारने काढलेल्या जीआरची होळी करून हा निर्णय रद्द करण्यासंदर्भात प्रचंड धरणे आंदोलन दि. 18 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी युवक शहर आणि ग्रामीणच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भाजपा सरकार केंद्रात आणि राज्यात कंत्राटी पद्धतीचा नियम लागू करून कर्मचार्यांच्या अधिकारांवर गंडांतर आणीत आहे. केवळ मोठ्या उद्योगपतींना जोपासण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती सुरू केली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर आणि ग्रामीणच्या वतीने नांदेड शहरातील आयटीआय चौकात सकाळी 10.30 वाजता प्रचंड धरणे आंदोलन करून राज्य सरकारने काढलेला 6 सप्टेंबर 2023 चा जीआर रद्द करावा, एजन्सी नियुक्त करण्यात येऊ नये, राज्यातील शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच 6 सप्टेंबरच्या जीआरची होळी करून राज्य सरकारचा निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी नोंदविला. तसेच सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, बंटी लांडगे, गणेश तादलापूरकर, इनुस खान, शफीउर रहेमान, मकसूद पटेल, लखनसिंघ लांगरी, निखील नाईक, इस्लम चाऊस, नईम खान, सय्यद इलियास, राजूरकर, अॅड. प्रमोद नरवाडे, सलमान बिल्डर, अॅड. बाळासाहेब सोनकांबळे, आंबादास जोगदंड, रवीभाऊ पाटील, अभिजीत पांचाळ, कपिल पाटील, पांडुरंग क्षीरसागर, शेख इसूफ, सौरभ गायकवाड, खदीर खुरेशी, सरजू हातागळे, कामरान खान, शेख सैफ, पंकज कांबळे, वाजीद पठाण, नूर पठाण, विक्की सरपाते, काजी अ.वहाब, अतिक बिल्डर, मोहमदी पटेल, विक्कीसिंघ गील, सईदा पटेल, गंगाधर चव्हाण, राहुल जाधव, विक्रम ठाकूर, मन्मथ वाळके, रूपेश शिंदे, इसुफ अन्सारी, अजिंक्य गायकवाड, गोविंद सोनटक्के, निखील गायकवाड, निखील हटकर, योगेश शिंदे, सुमीत साबळे, गजानन गोरख, संदीपराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर डुकरे पाटील, संभाजी सूर्यवंशी, बंटी सूर्यवंशी, ओमकार बोकारे, नितीन धुमाळ, चांदोजी सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, कंटीकराम पा.सूर्यवंशी आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती चुकीची -डॉ. सुनील कदम
राज्य सरकारने अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेऊन एक एजन्सी मार्फत त्यांच्या नियुक्ती केली जाईल, असा आदेश काढला आहे. हे कंत्राटी पद्धतीचे नोकर भरतीचे धोरण राज्य सरकारचे चुकीचे आहे. त्वरित त्यांनी हे धोरण मागे घ्यावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी सांगितले.
कंत्राटी नोकर भरती बेरोजगार वाढवणार- धनंजय सूर्यवंशी
भाजपा सरकार राज्यात व केंद्रात चुकीचे धोरण राबवत असून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम या सरकारने चालवले आहे. आता भाजपने राज्यात कंत्राटी पद्धतीने विविध नोकर्या भरण्याचा घाट घातलेला आहे. त्यामध्ये शाळा, विविध संस्था आदींचा समावेश असून यामुळे आणखी बेरोजगारी वाढणार आहे. 6 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेला निर्णय रद्द करावा, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण नांदेड जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
खाजगी नोकरीचा भाजपना चुकीचा अजेंडा - रऊफ जमीनदार
विविध आरक्षणाच्या नावाखाली आपापसात लढवण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. आता सर्वसामान्य युवकांच्या हातात नोकरी असताना त्याला कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करून परत बेकार करण्याचा घाट राज्यातील शिंदे-फडणवीस या भाजपाप्रणित सरकारने घातला आहे. त्वरित तो निर्णय मागे घ्यावा, अन्यथा याहून अधिक तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment