व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 12 September 2023

पाच हजाराची लाच घेताना रेल्वेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात न्यायालयाने दिली 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

 पाच हजाराची लाच घेताना रेल्वेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात न्यायालयाने दिली 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी 


नांदेड  रेल्वे स्थानक वर  फ्लॅट  फॉर्म क्रमांक चार वर विद्युत विभागातील सीबीआय लाचलुचपत विभागाने रेल्वे येथील कर्मचाऱ्याला रंगी हात पकडले आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 तारखे  पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वाहनांचे तब्येत बिल काढून देण्याच्या मागणीसाठी लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे 


नांदेड - वाहनाचे थकीत बिल काढून देण्याच्या मागणीसाठी पाच हजाराची लाच घेताना सीबीआयच्या लाच लूचपत विभागाने एका रेल्वे अधिकाऱ्याला अटक केली. एम शिवय्या असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील तक्रारदाराने नांदेड, छत्रपती संभाजी नगर आणि पूर्णा रेल्वे विभागात पिकअप वाहन उपलब्ध केला होता. महिन्या काठी प्रत्येकी वाहनाला 47 हजार 999 वाहन भाड रेल्वे विभागाकडून दिले जाणार होते. मात्र मागील दोन वर्षा पासून तक्रारदाराला पैसे काही मिळाले नाही. जवळपास 34 लाख 55 हजार 928 रुपये एवढं बिल थकीत होतं. थकीत बिल मिळवण्यासाठी तक्रारदाराने इलेट्रिकल विभागातील वरिष्ठ अभियंता एम शिवय्या यांच्या कडे मागणी केली होती. तेव्हा एम शिवय्या यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली होती. पाच हजार हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित पाच रकमेसाठी तगादा लावला जातं होता. त्यामुळे 7 सप्टेबर रोजी तक्रारदाराने पुणे येथील सीबीआयच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयच्या पथकानी सोमवारी सापळा रचला आणि कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची उर्वरित रक्कम घेताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली. पूर्णा येथील अधिकाऱ्यावर देखील या पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे. दरम्यान मंगळवारी अधिकाऱ्याला नांदेडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने अधिकाऱ्याला 14 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीबीआय पथकाच्या या कारवाईने रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सी  बी आय च्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली आहे एका भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकून न्यायालयासमोर हजर केले आहे यापुढील काळात यासोबत आणखीन कोणी दोषी आहेत का याचा तपास पोलीस विभाग करत आहे


No comments:

Post a Comment