मुंबई, 3 मे : घराघरातली लहान मुलंसुद्धा अलिकडे दिवसभर मोबाईल गेम्स खेळण्यात आणि टिव्ही पाहण्यात मग्न असतात. मात्र हे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून जे तरंग निघतात ते मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) ने म्हटलं आहे. लहान मुलांना जीवघेण्या आजारांपासून वाचवायचं असेल तर चुकूनही त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका असं WHO ने म्हटलं आहे.
अलिकडे लहान मुलंसुद्धा मोठ्यांचं अनुकरण करत तासंतास मोबाईल गेम्स खळत बसतात किंवा टिव्ही पाहण्यात मग्न होतात. मात्र हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. यासंदर्भात WHO ने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये मुलांचा समग्र विकासाबाबत WHO ने काही गाईडलान्स दिल्या आहेत. मोबाईल, टिव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून आणि त्यांच्या स्क्रीनमधून जे तरंग निघतात त्यामुळे मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास खुंटतो. जरी ही उपकरणं आपल्या सर्वांच्या गरजा पूर्ण करत असल्या तरी 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांपासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं WHO ने म्हटलं आहे.
WHO नुसार, 1 वर्षाच्या नवजात बाळाला इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून आणि त्यांच्या स्क्रीनपासून त्यांना दूर ठेवायला हवं. तसंच त्यांना स्ट्रॉलर्स, हाय-चेयर्स, स्ट्रॅप ऑन कॅरियर्समध्ये 1 तासापेक्षा जास्त वेळ ठेऊ नये. जास्ती जास्त त्यांना एक्टिव्ह ठेवा असंही म्हटलं आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टिव्ही किंवा मोबाईल स्क्रीनसमोर जास्त वेळ बसून राहतात. त्यामुळे त्यांची जीवनशैली मंदावते. त्यांना शांत झोप लागत नाही. परिणामी त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास न झाल्याने अनेक आजार त्यांना जडतात. पुढे उद्भवणाऱ्या जीवघेण्या आजारांपासून त्यांना वाचवायचं असेल तर पालकांनी वेळीच सावध व्हावं असं WHOने म्हटलं आहे.

No comments:
Post a Comment