व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 3 May 2019

नांदेडमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या



नांदेड - जिल्ह्यातील पार्डी म.(ता. अर्धापूर) येथील शेतकऱयाने सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज (३ मे) दुपारच्या सुमारास घडली. चंद्रकांत श्यामराव देशमुख (वय-४३) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.तालुक्यातील पार्डी म.येथील शेतकरी चंद्रकांत श्यामराव देशमुख यांच्यावर बँक ऑफ इंडियासह विविध बँका व खासगी कर्ज होते. त्यांच्या शेतात केळीचे पीक होते. परंतु, काही दिवसापासून दुष्काळामुळे केळीला पाणी कमी पडत होते. त्यातच लोडशेडिंगमुळे पाणी देणे शक्य नव्हते. दरम्यान, यावर मोठा खर्च करूनही सतत नापिकी होत होती.
या विवंचनेतून चंद्रकांत यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृताचे भाऊ राजेश्वर देशमुख यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगांवकर करत आहेत.

No comments:

Post a Comment