लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (मंगळवारी) राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. सुमारे अडीच कोटी मतदार २४९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानयंत्रात बंद करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतकौल दिला जाणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्व २६, केरळमधील २०, गोव्याच्या दोन आणि दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या एका जागेचा समावेश आहे. याखेरीज महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १४ तर उत्तर प्रदेशतील दहा, छत्तीसगडमधील सात आणि बिहारमधील पाच जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर, समाज वादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा, तर वायनाड या आणखी एका मतदासंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लढत आहेत.
राज्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठापणाला आहे.

No comments:
Post a Comment