नवी दिल्ली - सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित आता लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने त्यांना दिल्लीतून तिकीट दिले आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार अशी चर्चा होती. परंतु, काँग्रेसने आपल्या 6 उमेदवारांची यादी जारी करून युतीच्या चर्चांवर पडदा टाकला आहे. दिल्लीतील एकूणच 7 पैकी 6 जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उतरवले आहेत. तर उर्वरीत एका जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.
माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल शीला दीक्षित यांना काँग्रेसने पक्षाचे काम सोपविले होते. त्यांना दिल्लीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या आता ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. यासोबतच काँग्रेसचे माजी दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचेही उमेदवारांमध्ये नाव आहे. त्यांना नवी दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या शीला दीक्षित यांना नव्याने स्थापित

No comments:
Post a Comment