व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 10 March 2018

ज्येष्ठ नागरिक, सायबर क्राईम, ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावरीलएक दिवसीय कार्यशाळा संपन्न



नांदेड, दि. 10:- आई - वडिल व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणार्थ अधिनियम -2007 व नियम 2010 , सायबर क्राईम, ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी यशदा, पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रम तीन सत्रात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली होते.
या कार्यशाळेचे उद्घाटक नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधिश सुधीर कुलकर्णी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे , व्यासपीठावर कौटूंबिंक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश गोविंद वायाळ, अप्पर जिल्हाधिकारी  संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बारगळ, अप्पर जिल्हा शल्य चिकित्सक श्री. गुंटूरकर, शासकीय अभियोक्ता  डी.जी.शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, ज्येष्ठ नागरिक जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष हंसराज वैद्य, जिल्हा ज्येष्ठ नागरिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक तेरकर,  तसेच या कार्यशाळेचे यशदा, पुणे यांच्यामार्फत नियुक्त करण्यात आलेले वक्ते प्रा.अंबादास मोहितेसायबर क्राईमचे संदिप गादिया, ॲङ अनंत खेळकर,  यांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी यांनी केले. तर नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद आणि प्रमुख जिल्हा न्यायाधिश सुधीर कुलकर्णी यांनी यावेळी मौलिक मागर्दर्शन केले. 
प्रथम सत्रात आई - वडिल व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणार्थ अधिनियम -2007 व नियम 2010 यशदा, पुणे यांच्यामार्फत नियुक्त करण्यात आलेले वक्ते अंबादास मोहिते यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले.
यशदा, पुणे यांच्यामार्फत नियुक्त करण्यात आलेले वक्ते अंबादास मोहिते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुलं त्यांचा सांभाळ करत नसतील , तर याविषयी उपविभागीय अधिकारी (महसूल ) यांच्याकडे निर्वाह भत्ता संदर्भातील कार्यवाहीबाबत अर्ज करण्यापासून ते निर्वाह भत्ता मिळण्यापर्यंतच्या कार्यवाहीबाबतची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे अपीलही करता येते. याबाबतही यावेळी माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात सायबर क्राईम या विषयावर संदिप गादिया यांनी मोबाईलच्या माध्यमातून एसएमएस तसेच वेगवेगळ्या पध्दतीने गुन्ह्यांचे प्रमाण तसेच होत असलेल्या गुन्हेगारीबाबत इंटरनेट मोबाईल बँकिग, पासवर्ड  सुरक्षेबाबतची मौलिक माहिती दिली. 
तिसऱ्या सत्रात ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर ॲङ अनंत खेळकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभागृहातील मान्यवरांची मने जिंकले.
तसेच कार्यक्रमाप्रसंगी सर्वांच्या प्रश्नोत्तरे तास घेण्यात आला व त्यांच्या शंकाचे समाधानही करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधिश, सहाय्यक सरकारी अभियोक्ता , सहाय्यक शासकीय अभियोक्ता उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, तसेच समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे समाजशास्त्र विषयाचे एमफिल व पीएचडीचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मंडळाचे सर्व पदाधिकारी, नायब तहसीलदार, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे विधी अधिकारी आदि विविध विभागांचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी काकडे, नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी केले . तर उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी यांनी आभार मानले. 
****

No comments:

Post a Comment