आदिवासी मुलींच्या वसतिगृहात मासिक पाळी एक वरदान आणि जैविक सॅनिटरी नॅपकिन एक काळाची गरज यावर स्त्री रोग तज्ञ डॉ शिल्पा बोमनाळे यांचे व्यखाय संपन्न.
जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन या दोन्ही आयोचित्य साधून आदिवासी महिला वसतिगृह मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय शैक्षणिक सेवाभावी संस्थे तर्फे व्यखायनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती स्त्री रोग तज्ञ डॉ.शिल्पा संतोष बोमनाळे संकल्प हॉस्पिटल , संजविनीताई देशपांडे ,वसतिगृह प्रमुख कोकाटे मॅडम होते.या कार्यक्रमची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.या कार्यक्रमाचा विषयाला सुरुवात करताना डॉक्टर मॅडम बोलत होत्या की मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील फार महत्वाचा भाग आहे. जोवर स्त्रीला पाळी येत नाही, तोवर तिला पूर्णत्व नाही, अशी समाजात धारणा आहे. त्यामागील कारण म्हणजे पाळी आल्याशिवाय स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही. इतकी महत्वाची असलेली ही मासिक पाळी आजही अंधश्रद्धेने ग्रासलेली दिसते. मासिक पाळी म्हणजे काहीतरी घाण अशी भावना खेड्यापासून शहरापर्यंत सहज आढळून येते. पाळी आली की घराच्या बाहेर राहणं हे दृश्य ग्रामीण भागात सहज दिसतं. त्यातच त्या स्त्रीचा कुठे चुकून स्पर्श झालाच, तर ती जागा पाणी टाकून धुतली जाते किंवा त्यावर गोमूत्र टाकण्यात येते. म्हणजे गाईचे मूत्र पवित्र आणि आईला, बहिणीला येणारी पाळी अपवित्र, याचं काय लॉजिक आहे तेच कळत नाही.त्याच बरोबरीने आता जैविक सॅनिटरी नॅपकिन दबक्या आवाजात मागितला जातो सध्या तरी सॅनिटरी नॅपकिनचा कमी प्रमाणात यांचा वापर होतो अगदी सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देणार. कशाला हवी एवढी लपवा-छपवी? आपण तर आता शहरात राहतो येथे सुध्दा ही परिस्थिती म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे असे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शिल्पा बोमनाळे मॅडम यांनी बोलताना म्हणाल्या. महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याकरीता महिलांना समान न्याय ,हक्क,अधिकार व सन्मान देऊनच महिला सक्षम झाल्यास समाज आणि राष्ट्र बलवान होऊ शकतो,ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देशच सुसंस्कृत होतो असे मत संजीवनी देशपांडे यांनी मत व्यक्त केले.
प्रास्तविक या संस्थेचे सहसचिव भास्कर डोईबळे यांनी बोलताना म्हणाले की येणाऱ्या शैक्षिणक वर्षात आमच्या संस्थेच्या वतीने प्रत्येक महाविद्यालयात सॅनेटरी नॅपकिन पडची मशीन बसवली की यांची पाहणी करणार व त्यावर योग्य ते कार्यवाही साठी पुढाकार घेणार असे म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ काळवणे यांनी केल.

No comments:
Post a Comment