मुक्रमाबाद.प्रतिनिधी ता.३ धुलीवंदना नंतर कुंद्राळा मध्यम प्रकल्पात फिरण्यास गेलेल्या दोन तरुणांना सेल्फी च्या नादात नाव उलटून जलसमाधी मिळाली तर तिघे बाल बाल बचावले असल्याची घटना शुक्रवारी (ता.२) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडून आली.
धुली वंदणा दिवशी रंगपंचमी साजरी करून करीचे जेवण करण्यासाठी कुंद्राळा मध्यम प्रकल्पाच्या विश्रामगृहाजवळ पार्टी केली आणि त्यानंतर प्रकल्पात फिरण्याचा आनंद घ्यावा या उद्देशाने गेलेल्या बाराहाळी येथिल तिन व सुगाव (बु) येथिल दोन अशा पाच मित्रांनी एका नावेत बसुन प्रकल्पातील पाण्यात फिरत असताना तरूणांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही,व त्यांनी मोबाईल मध्ये सेल्फी घेत असताना सर्वांचा भार एकाच बाजुला झाला त्यामुळे नाव पलटली . त्यातील पाचही तरुण पाण्यात पडले , प्रकल्पाच्या मध्यभागी नाव पलटल्यामुळे आणि तेथे पाण्याची खोली जास्त होती त्यामुळे ते सर्व तरुण पोहून बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र नाव उलटल्या पासून काठापर्यँतचे अंतर जास्त असल्याने काठावर येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले मात्र त्यापैकी शहाजी बालाजी अस्वले (३२),हा तरूण पोहून बाहेर पडण्यास यशस्वी झाला. तर संतोष शेषराव सोनकांबळे ( ३२) व तय्यब सरवरसाब शेख ( २८ ) या दोघांनी पलटलेल्या नावेला धरून कोसबसे काठावर पोहचले तर पोहून काठ गाठण्याचा प्रयत्न करत असलेले १) लक्ष्मण नारायण इबितदार (३२) व फय्याज राजेसाब शेख ( ३२) यांना मात्र यश आले नाही , कांही अंतरापर्यंत पोहल्या नंतर त्यांना दम लागुन त्यांचा पाण्यात बुडून सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. या घटनेचे वृत समजताच बाराहाळी व परीसरातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली .पोलिस प्रशासन व स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने मयतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले . शनिवारी सकाळी मुखेड , नादेड व बारूळ येथिल बचाव पथकाने संयुक्त शोध मोहिम राबवून तब्बल आठरा तासानंतर एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दूसऱ्या मृताच्या देहाचा अद्याप शोध लागला नाही. मृत तरुण विवाहीत असुन त्यांच्या अपघाती निधणामुळे बाराहाळी गावावर शोककळा पसरलीआहे. लक्ष्मण ईबितदार यांचा पार्थिव प्रा. अरोग्य केंद्र बाराहाळी येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.
# या घटनेची माहीती मिळताच तालुक्याचे आमदार डा . तुषार राठोड, तहसिलदार अतुल जटाळे, बारा हाळीचे उपसरपंच शेखर देशमुख,कृ. उ.बा.स. सभापती खुशाल पा. उमर द रीकर ,राजन देशपांडे, हणमंत वाडीकर, धोंडीराम पा. अस्वले, मुक्रामाबाद ठाण्याचे ए.पी.आय. नितीनकुमार इंद्राळे, गणेश पा. जाधव आदींनी घटना स्थळी भेट दिली, या वेळी परिसरातील हजारो नागरीक मोठया सेख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment