व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 2 March 2018

मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योजक गणपतराव मोरगे यांचं निधन


मराठवाड्यातील प्रसिद्ध कंत्राटदार उद्योजक गणपतराव मोरगे यांचे आज मुंबईत लीलावती रुग्णालयात ६२व्या वर्षी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात विविध विकास उपक्रम आणि सिंचन प्रकल्प निर्मितीत त्यांनी महत्वाचे योगदान दिले होते. नांदेडच्या मल:निसारण प्रकल्प, निर्मिती जलशुद्धीकरण प्रकल्प, दिग्रस बंधारा, बळेगाव बंधारा यासह विविध प्रकल्पाची निर्मिती त्यांच्या शारदा कन्स्ट्रक्शनने केली होती.
शुक्रवारी दुपारी ३ वाजता गणपतराव यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव विमानाने सायंकाळी नांदेडला विमानाने आणण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर भोसी तालुका भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, ३ मुली, जावई, नांतवंडे असा परिवार आहे

No comments:

Post a Comment