व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 19 March 2018

पुणे: मिलिंद एकबोटेला कोर्टात काळं फासण्याचा प्रयत्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ




पुणे- काेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटक करण्यात अालेला समस्त हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे याला पुन्हा एकदा दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पुणे सत्र न्यायालयाच्या आवारात एकबोटेवर काळं फासण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मिलिंद एकबोटेला बुधवारी अटक करण्यात आली होती तर, गुरुवारी न्यायालयात हजर केले. या वेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दाेन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद एेकून घेऊन एकबाेटेला १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. पोलिस कोठडी संपल्याने आज पुन्हा एकबोटेला न्यायालयात हजर करण्यात आले असता आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढविण्यात आली.
याप्रकरणी शिक्रापूर पाेलिस ठाण्यात अनिता रवींद्र सावळे (३९, रा. काळेवाडी, पुणे) यांनी मिलिंद एकबाेटे आणि शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांच्याविराेधात फिर्याद दिलेली अाहे. जयश्री सुदाम इंगळे (रा. अाैरंगाबाद) यांनी या दाेघांसाेबतच अनिल दवे यांच्याविराेधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

तर, बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सुषमा दगडूराव अंधारे यांनी काेरेगाव भीमा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच गणेशबापू फडतरे अाणि याेगेश नरहरी गव्हाणे या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटेंच्या सांगण्यावरून दंगल घडवल्याची तक्रार दिली अाहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर एकबोटेला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, एकबोटेला मधुमेह असल्याने वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले

No comments:

Post a Comment