कल्याणी वाघमोडे
बारामती - स्त्री हि त्याग ,नम्रता , श्रद्धा , सुजाणपणा याची मूर्ती असते . स्त्री म्हणजे मायेची सावली समजली जाते परंतु अन्यायाच्या विरोधात संतापली तर ती दुर्गा - काली हि बनते , याचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे म्हणूनच ज्या ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान केला जातो , त्या दिनाच्या निमीत्तने समस्त महिला वर्गाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात . धनगर समाजाचे प्रलम्बित प्रश्न मार्गी लावावेत .
बारामती येथे झालेल्या धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान उपोषण सोडतेवेळी , पहिल्याच कॅबिनेट मध्ये आरक्षणा चा निर्णय घेऊ म्हणणारे आणि नागपूरच्या पहिल्या मेळावा कार्यक्रमात महाधीवक्त्यांशी चर्चा करून १५ दिवसात आरक्षणाचा निर्णय घेऊ म्हणणारे आजचे मुख्यमंत्री तीन - साडे तीन वर्ष झाले तरीही काहीही करू शकले नाहीत .
भाजपा सरकारने सबंध पुरावे डावलून TISS (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशियल साइन्स ) ला सर्वे करण्यास दिले .अनेक राज्यात राज्यघटने प्रमाणे धनगरांना ,SC , ST चे आरक्षण लागू आहे . त्या राज्यांना धनगरांना आरक्षण देण्याकरता कधीच सर्वे करण्याची गरज पडली नाही मग महाराष्ट्रात बीजेपी सरकारलाच का ?????
तसेच नुकतेच ५ नोव्हेंबर २०१७ ला नागपूर येथे मुख्यमंत्री महोदय यांनी धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देत सोलापूर विद्यापीठाला पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नाव देण्याचे जाहीर केले .आणि ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत tiss चा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल , असे परत एकदा आश्वासन दिले परंतु तीही वेळ आता निघुन गेली आहे . गेली साडे तीन वर्ष आम्ही या फसव्या सरकारची हवेतील आश्वासने ऐकत आहोत .
२०१८ सम्पत नाही तोच २०१९ मध्ये केंद्र व राज्याच्या निवडणुका येणार .त्यामुळे काहीतरी प्रस्ताव पाठवण्याचे व धनगर समाजाला भावनिकतेवर स्वार करून मतदान लाटण्याचे षडयंत्र बीजेपी सरकारचे आहे , हे स्पष्ट झाले आहे .आधीच्या सरकारने जाणीवपूर्वक धनगर समाजावर अन्याय केला म्हणून २०१४ ला भाजपा ला बहुमत मिळाले .
भाजपा नेत्यांनी सत्तेत आल्यास धनगर समाजाला ST चे आरक्षण लागू करू असे लेखी आश्वासन दिल्याचे पत्र , फोटो , विडिओज सर्वाकडे उपलब्ध आहेत , बीजेपी नेत्यांनी धनगरांची घोर फसवणूक केली या सबबीखाली प्रत्येक जिल्ह्यातून फडणवीस सरकारविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येईल .तत्पूर्वी ८ मार्च रोजी मुम्बई येथे समस्त धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व पुढील दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेण्याचे अहिल्याक्रांती प्रतिष्ठान व क्रांती सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी जाहीर केले आहे .
८ मार्च रोजी मुख्यमंत्री महोदय यांनी आपली उपस्थिति दर्शवून पिवळा भंडारा उचलून आपले म्हणणे स्पष्ट करावे , अन्यथा पुढील टप्प्यात धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री बंगल्याच्या समोर जागरण गोंधळ घालण्यात येईल .
या एकदिवशीय लाक्षणिक उपोषणाला सर्व सामाजिक संघटनांनी आपला पाठींबा दर्शवला आहे .यामधे प्रामुख्याने काम करणाऱ्या यशवंत सेना , ऑ ल इंडिया धनगर महासंघ , धनगर समाज सेवा संस्था , जय मल्हार युवा मंच , समाजोन्नती मंडळ मल्हार क्रांती सेना , मौर्य प्रतिष्ठान , मल्हार प्रतिष्ठान , युवा मल्हार सेना , ओबीसी एन टी फाउंडेशन , अशा अनेक संघटनानी व काही पक्षांनी आपला पाठीम्बा जाहीर केला आहे .
या मार्गदर्शन मेळाव्यातून सर्व समाज संघटीत होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात पिवळी लाट येऊन दबावगट तयार होणार आहे .या मेळाव्यांत समाजाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे असतील .यामध्ये राज्यघटने प्रमाणे धनगर समाजाला एस टी चे प्रमाणपत्र मिळणे , सरकारने ओबीसी समाजाची जनगणना त्वरित करावी , ओबीसी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शिष्यव्रुत्ती व वैद्यकीय प्रवेशबाबत केलेल्या कपातीचा जी आर त्वरित रद्द करावा , सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नावाची अंमलबजावणी करावी , मेंढ्यासाठी राखीव चराई क्षेत्र व मेंढ्याचा विमा उपलब्ध करावा .
धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी समस्त धनगर समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे .

No comments:
Post a Comment