मुखेड (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विषयाच्या अभ्यास मंडाळावर मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्रा.डॉ जानका संग्राम पांडुर्णे (पाटील)यांची कुलगुरूकडुन नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ.पांडुर्णे यांनी विद्यापीठाच्या परिक्षा विभागात सहकेद्र प्रमुख,परिक्षा नियामक परिशक , महिला दक्षता पथक अशा विविध कार्यासह सामाजिक कार्यात सुधा विविध शाळा अनेक महाविद्यालयात अनेक व्याख्याने व मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोठे योगदान आहे.तसेच महाविद्यालयाच्या विविध समित्या कार्य सुरु आहे. या निवडीबद्दल संस्था व सर्व सदस्य तसेच प्राचार्य ,प्राध्यापकांनी व पत्रकार, सामाजिक संघटनेनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment