व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 4 February 2018

इसिसची सेक्स स्लेव्ह बनवण्यासाठीच ‘त्याने’ केला विवाह!




कोची
बलात्कार करून व्हिडीओ बनवला, धर्मपरिवर्तन करून लग्न केलं आणि इसिसची सेक्स स्लेव्ह बनवण्याचा प्रयत्न केला असा आरोप एका महिलेने आपल्या नवऱ्यावर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने मोहम्मद रियाज (२७) या तरुणाला अटक केली आहे.
एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कन्नूर येथे राहणाऱ्या रियाजवर त्याच्याच बायकोने इसिसची सेक्स स्लेव्ह बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याच कारणासाठी रियाजने आपल्याशी विवाह केल्याचं महिलेचं म्हणणं आहे. तिला सौदी अरेबियात घेऊन जाण्याच्या खटपटीत रियाज होता. त्यासाठीचे दस्तावेजही तो बनवत होता, असा आरोप महिलेने केला आहे.
सूत्रांनुसार, या महिलेची आणि आरोपीची ओळख २०१४मध्ये कॉलेजमध्ये असताना झाली होती. ते दोघेही एकत्र शिकत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर रियाज तिच्यावर बलात्कार करत होता आणि त्याचा अश्लील व्हिडीओही त्याने बनवला होता, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर रियाजने जबरदस्तीने तिचा धर्म बदलला आणि तिच्याशी विवाह केला. तो तिला मारहाणही करत असे. लग्नानंतर तो तिला जेद्दाहला घेऊन जाणार होता आणि तिथून सीरियामध्ये इसिसच्या हवाली करणार होता, असं महिलेचं म्हणणं आहे.
महिलेने रियाजविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता, सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला तपासाचे आदेश दिले होते. एनआयएने शनिवारी जेद्दाहवरून परतणाऱ्या रियाजला कोची विमानतळावर अटक केली. अटकेनंतर झालेल्या चौकशीत रियाजने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपली पत्नी तिच्या वडिलांच्या दबावाखाली येऊन आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचं रियाजचं म्हणणं आहे. पतीपत्नीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न महिलेचे वडील करत असून सदर महिला ऑक्टोबर २०१७ पासून आपल्या माहेरी जामनगर येथे राहत आहे, असे आरोप रियाजने केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एनआयएची पथकं बेंगळुरू आणि गुजरातला जाणार आहेत.

No comments:

Post a Comment