व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 5 February 2018

न्याय द्या अथवा कुटुंबासाठी शस्त्र उचलावे लागेल…बीएसएफ जवानाचा इशारा

लखनौ
उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराज असलेल्या बीएसएफ जवानाने नुकताच एक व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट केला आहे. सहारनपूर जिल्ह्यातील गगोह गावातील सरपंचाने पोलिसांच्या मदतीने आपली जमीन हडप केल्याचा आरोप जवानाने केला आहे. तसेच पोलिसांनी खोट्या आरोपाखाली कुटुंबातील महिलांना तुरुंगात टाकले असून वडिलांनाही २० दिवसांपासून तुरुंगात डांबले आहे. कृपया याची नोंद घ्यावी व माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा नाईलाजाने मला शस्त्र उचलावे लागेल असे या व्हिडिओत जवान बोलत असल्याचे दिसत आहे
व्हिडिओमध्ये जवान स्वत:चा परिचय करुन देताना दिसत आहे. माझे नाव अजय कुमार असून हिंदुस्थान बांग्लादेश सीमेवर मी तैनात आहे. पण मी देशाची सुरक्षा करत असतानाच माझ्या कुटुंबाला मात्र कसलीही सुरक्षा मिळालेली नाही. काहीजणांनी माझ्या शेतातले उभं पिकं उद्वस्त केलं असून घरातील महिलांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबल आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी वडिलांनाही मारहाण करून तुरुंगात डांबल्याचं जवानाने व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच याबद्दल मी त्यांना जाब विचारला असता माझ्यावरही खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी संबंधितांनी दिली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याकडे लक्ष द्यावे अशी विनंती तरुण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

No comments:

Post a Comment