व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 19 January 2018

बडुर परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस.! पँथर् सेनेने दिले तहसीलदारांना निवेदन.



बिलोली प्रतिनिधी/
देगलूर वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या  बिलोली तालुक्यातील बडुर येथे जंगली प्राण्यांने  शेतकऱ्यांच्या तोंडी आलेले हरभरा,तूर,ज्वारी हे पीक पळवल आहे.एकीकडे कोरडा दुष्काळ,ओला दुष्काळ या संकटातून सावरत असतांनाच जंगली प्राण्यांने शेतकऱ्यांच्या शेतात घातलेल्या रानडुकराच्या कळपाने पिकांचे खूप मोठे नुकसाने केले आहे.या संबधी वनविभागाच्या महा फॉरेस्ट या वेबसाइट वरून बडुरच्या काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी अर्ज 2 महिन्यापूर्वी  केला होता.वनविभागाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण करून दिली.आज दोन महीने उलटूनही शेतकऱ्यांना कुठल्याच पद्धतीची नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे संतप्त शेतकरी संतप्त झाले आहेत.
     इंडियन पँथर् सेनेचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांच्या नेत्रुत्वात काल तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी शेषेराव जेठे,शिवाजी विचारे,लोकस्वराज्य आंदोलनाचे लालबा गोनेकर,देविदास कोंडलाडे,आदि उपस्थित होते.तात्काळ नुकसान भरपाई नाही मिळाल्यास 26 जानेवारीला उपविभागिय वन संरक्षण अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर संबधीत शेतकऱ्यांने जवाब दो आंदोलनाचा इशारा दिला आहे.तहसीलदाराना देण्यात आलेल्या निवेदनावर सौ.शांताबाई दुगाने,भीमराव दुगाने,गौतम सोनकांबळे,विठाबाई दुगाने,गोदाबाई सोनकांबकळे,सोपान सोनकांबळे,लक्ष्मण भालेराव इत्यादि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत

No comments:

Post a Comment