व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 19 January 2018


जळगाव : जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत साहेबराव पाटलांनी अमळनेर येथे बाजार समितीच्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. 
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील अमळनेर मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून जाणं पसंत केलं. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. 
नेहमी पवारांचे गुणगान गाणारे साहेबराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अमळनेर बाजार समितीच्या कार्यक्रमाला तीन कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थिती लावलेली असताना जिल्ह्यातले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मात्र पाठ फिरवली. 

No comments:

Post a Comment