(प्रतिनिधी, हदगाव)
या ठिकाणी बेटी बचाव बेटी पढाव या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटण मा. आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. विमलताई पा. साळवे, श्री. बि.व्ही साधुलवार आणि श्री. रामकृष्ण चेपुरवार उपस्थित होते. पुस्तकाचे लेखक श्री. सतिश चेपुरवार यांचे वडिल अत्यंत गरीब असुन त्यांचा व्यवसाय करदोडे विकन्याचा आहे. त्यांचा मुलगा शासकीय विश्राम गृहात खाजगी नौकरी करत असुन त्यांच्या डोक्यात ही संकल्पना होती. सध्याच्या काळात अशा युवकाची कमतरता असल्यामुळे आज जगात शेकडा 15% मुलीची कमतरता असल्यामुळे सर्व महिलाना सदरील पुस्तकाव्दारे विनंती आहे की मुलीची हत्याकरू नये. मुलगी हि कुनाची आई होऊ शकते, कुनाची बहीन होऊ शकते, पत्नी होवू शकते. ती स्त्री सर्व देशामध्ये उच्य पदावर जाउन विराजमान होउ शकते. तिची हत्या का या पुस्तकाचे नाव हृदयाला हेलावणारे आहे. मी आई तुझीच या पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवराचे हस्ते करण्यात आले. मा. हेमंत पाटील (आमदार) इतर सर्व मान्यवरानी भरभरूण शुभेच्छा दिल्या.
संयोजक: श्री. सतिश चेपुरवार

No comments:
Post a Comment