व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 6 January 2018

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कुर्ला-पनवेल विशेष लोकल


अभियांत्रिकी कामे करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.

मुंबई : अभियांत्रिकी कामे करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल. मध्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी ४.०२ वाजेपर्यंत; तर हार्बर रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेमार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावरून धावतील. तर धिम्या मार्गावरील काही लोकल फेºया रद्द केल्या आहेत.
मध्य रेल्वेमार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी ४.०२ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाºया व अप धिम्या मार्गावर धावणाºया सर्व उपनगरीय लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. तसेच सीएसएमटी येथून १०.१६ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत सुटणाºया डाऊन मार्गावरील जलद लोकल निर्धारित थांंब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने शेवटच्या स्टेशनवर पोहोचतील.
कल्याणहून सकाळी ११.०४ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंतच्या काळात सुटणाºया जलद लोकल निर्धारित थांब्याशिवाय दिवा, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. या गाड्या शेवटच्या स्थानकावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. दरम्यान, अप आणि धिम्या मार्गाची सेवा नाहुर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांसाठी उपलब्ध नसेल.

कुर्ला-पनवेल विशेष लोकल
- हार्बर रेल्वेमार्गावरील सीएसएमटी/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल येथे जाणा-या तसेच सीएसएमटी येथून सकाळी ०९.५६ ते दुपारी ०४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/अंधेरीकडे जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
- याचप्रमाणे पनवेल/ बेलापूर/ वाशीवरून सकाळी ०९.५३ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत सीएसएमटी येथे जाणाºया तसेच अंधेरी/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ०५.०९ वाजेपर्यंत सीएसएमटीच्या दिशेने जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ८वरून कुर्ला-पनवेल अशा विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील

No comments:

Post a Comment