- रशियातील सेंट पीट्सबर्ग येथे राहणारी यूलिया सकाळी-सकाळी सहज आपल्या फोनमध्ये इंस्टाग्रामचे फोटोज चेक करत होती. त्याचवेळी ती आपल्या पतीची मैत्रिण व्लादा अब्रामोविचच्या इस्टाग्राम अकाउंटवर पोहोचली. व्लादाच्या एका फोटोवरून तिची नजर हटतच नव्हती. व्लादाच्या फोटोतील जागा तिला कुठे तरी पाहिल्यासारखी वाटत होती. एक टक लावून पाहिल्यानंतर ती जागा आपल्याच बेडरुमच्या गॅलरी आणि खिडकीतून दिसणारा नजारा असल्याचे तिच्या लक्षात आले.
सुरुवातीला पती म्हणाला...
> व्लादा, यूलिया आणि यूलियाचा पती नजर ग्रीनको एकाच शहरात राहतात. ते एकमेकांना चांगले ओळखत होते. व्लादा शहरात आपल्या इंस्टाग्राम फोटोजमुळे चर्चेत असते. तिच्या त्याच फोटोखाली यूलियाने 'हा माझ्या बेडरूमचा सुंदर नजारा आहे' अशी कॉमेंट केली.
> यानंतर यूलियाने आपल्या पतीला या फोटोबद्दल विचारले. तेव्हा नजर म्हणाला, व्लादा आणि आमचे इतर मित्र घरी आले होते. आम्ही चहा नाश्ता केला. त्याचवेळी व्लादाने हा फोटो क्लिक करून इंस्टाग्रामवर पोस्ट केले. > त्यावर यूलिया भडकली. मित्र-मैत्रिणी घरी आल्यावर त्यांच्यासोबत किचनमध्ये किंवा गार्डनमध्ये जातात बेडरुममध्ये जात नसतात. सुरुवातीला नकार देणाऱ्या नजरने यानंतर आपले व्लादाशी रिलेशन असल्याचे मान्य केले. > आपले अफेअर पकडले गेल्यानंतरही नजर यूलियाला सोडण्यास इच्छुक नाही. मात्र, यूलियाने नजरला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.

No comments:
Post a Comment