व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 21 December 2017


नवी दिल्ली - रोहिणीच्या विजय विहार एरियात स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीच्या नावाने आश्रम चालवणारा वीरेंद्र देव दीक्षित स्वत:ला कृष्ण अवतार सांगायचा. तो नेहमी महिला शिष्यांमध्ये राहणे पसंत करत होता. वीरेंद्रने 16 हजार तरुणींसोबत संबंध प्रस्थापित करण्याचे टारगेट ठेवले होते. हायकोर्टाच्या निर्देशावरून मंगळवारी रात्री उशिरा आश्रमाची तपासणी करण्यासाठी पोहोचलेल्या महिला आयोग आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या व्हिडिओतून ही बाब समोर आली. यानंतर हायकोर्टाने म्हटले की, याप्रकरणाचा सीबीआय तपास झाला पाहिजे.
एनजीओने कोर्टाला केली होती विनंती
- आश्रमात अल्पवयीन मुली आणि तरुणींना बंधक बनवून सेक्शुअल हरॅसमेंटच्या आरोपानंतर एका एनजीओने कोर्टात न्यायासाठी विनंती केली होती.
- कोर्टाने या प्रकरणाला गंभीर असल्याचे सांगून मंगळवारी महिला आयोगाला तपासणीचे आदेश दिले होते. कारवाईनंतर टीमने बुधवारी हायकोर्टात रिपोर्ट सोपवली.
- अॅडिशनल चीफ जस्टिस गीता मित्तल आणि जस्टिस सी. हरिशंकर म्हणाले की, हे राम-रहीमसारखे प्रकरण असू शकते. सीबीआय तपास झाला पाहिजे.
- याआधी वीरेंद्रच्या शिष्यांनी आश्रमावर छापा टाकण्यासाठी आलेल्या पथकाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पुढे जाऊ दिले नव्हते. पथकाने याच मर्यादेत तपास केला असता बाबाचे अश्लील व्हिडिओ आणि पुस्तकांसहित अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या.
महिलांना दिले जात होते अंमली पदार्थ
- पथकाला मिळालेल्या व्हिडिओत समोर आले की, वीरेंद्र स्वत:ला कृष्ण सांगायचा आणि गोपिका बनण्यासाठी तरुणींना संबंध बनवण्यासाठी राजी करत होता. 
- आश्रमात तरुणींना पाच दिवसांपर्यंत एक खोलीत बंद केले जात होते. यानंतर बाबाचा व्हिडिओ दाखवून त्यांचे ब्रेनवॉश केले जायचे.
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती जयहिंद म्हणाल्या की, महिलांना अंमली पदार्थ दिले जात होते.

महिला म्हणाल्या- आम्ही दीक्षा घेत आहोत...
- तपास पथकाने महिलांना विचारले तर त्या म्हणाल्या की, आम्ही दीक्षा घेत आहोत, परंतु येथे कोणतेही धार्मिक ग्रंथ आढळले नाहीत. चार मजली आश्रमात बोर्डावर लिहिले होते,‘आपसे कोई पूछे कैसे हो तो बताना-ठीक हैं और खुश हैं.’
- शेजारी म्हणाले, रात्री तरुणी येथून ये-जा करतात. येथे सेक्स रॅकेट सुरू आहे. वय वाढल्यावर महिलांना बाहेर काढले जाते. अनेक राज्यांतील तरुणी येथे राहतात. यात मुख्यत्वे ओडिशा, बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहेत.
10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिली जायची सहमती
- हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या सीमा शर्मा म्हणाल्या, या आश्रमात अल्पवयीन मुलींना दीक्षा देण्याच्या बहाण्याने आणले गेले आहे.
- मुलींचे कुटुंबीय दर महिन्याला पैसेही पाठवतात. पालकांकडून 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यांची सहमती लिहून घेतली जाते.
- 18 वर्षे वय झाल्यावर तरुणींना कागदावर स्वाक्षरी करावी लागते. यात लिहिलेले असते- त्या स्वेच्छेने राहत आहेत.
10 तरुणींवर दररोज रेप
- आश्रमाच्या पाचव्या मजल्यावर टीन शेड आहे. येथे परवानगीशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. येथे ध्यान केंद्रातून प्रत्येक ठिकाणी नजर ठेवली जाते.
- महिलांच्या झोपण्याच्या जागीही. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती जयहिंद म्हणाल्या की, हे आश्रम एक प्रकारची छावणी आहे. प्रत्येक पावलावर मेटलचा दरवाजा, ज्यावर टाळे लागलेले आहेत.
- हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या सीमा शर्मांचा आरोप आहे की, बाबा नशा करून दररोज 10 तरुणींवर बलात्कार करत होता.
कसा झाला खुलासा?
- राजस्थानची एक महिला वीरेंद्र देवच्या आश्रमात अनुयायी म्हणून राहिलेली आहे. तिने आपल्या चारही मुलींना भक्तीसाठी सोडून दिले होते, यातील एक अल्पवयीन आहे.
- अल्पवयीन मुलीने आईला सांगितले की, बाबाने तिच्यावर बलात्कार केला. यावर महिला आणि तिच्या पतीने बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर पूर्ण प्रकरण समोर आले.
- बाबावर बलात्कारासहित अनेक कलमांतर्गत 11 गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिस त्यांचाही तपास करत आहेत. यात पीडितेने कृष्ण अवताराचा खोटारडेपणासहित सर्व अत्याचाराचा कच्चाचिठ्ठा सांगितला आहे

No comments:

Post a Comment