व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 20 December 2017

महिलेस विवस्त्र करून केली मारहाण; नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार


नगर-मालमत्तेच्या वादातून एका महिलेस १३-१४ जणांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर परिसरात रविवारी (१७ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दरोडा विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागचंद सोनाजी शिरसाठ, महेश ज्ञानदेव बनगे, गमेश बागचंद, पौर्णिमा महेश बनगे, रंभा ज्ञानदेव बनगे, संगीता नवनाथ कांबळे, अमोल नवनाथ कांबळे, राजू नवनाथ कांबळे, साखरबाई प्रकाश सोनवणे, राजसबाई देवराम मगर, विजय देवराम मगर, रमेश लक्ष्मण गावडे, राजू रामेश गावडे, अमोल रमेश गावडे (सर्व राहणार केडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला तिच्या नातेवाईकांमध्ये अनेक वर्षांपासून मालमत्तेचा वाद सुरू आहे. त्यांनी यापूर्वी एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल केली आहे. न्यायालयातही हा वाद सुरू आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी आरोपींनी महिलेच्या घरात प्रवेश करत तिच्या अंगावरील कपडे फाडून लाकडी दांडक्याने मारहाण केली. काहीजणांनी घरातील कपाटाची उचकपाचक करत कोर्टाची कागदपत्रे घरातच जाळली. कपाटातील सोन्याचे दागिने रोख २५ हजार रुपयांची रक्कम चोरल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर भागचंद सोनाजी शिरसाठ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड करत आहेत

No comments:

Post a Comment