व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 22 December 2017

बायकोशी भांडून नऊ वर्षे विमानतळावर राहिला



बीजिंग :
चीनमधील वेई जिआनगुओ या माणसाने नऊ वर्षांपूर्वी बायकोबरोबर झालेल्या भांडणानंतर आपले बस्तान घरातून थेट बीजिंगच्या विमानतळावर हलवलं. अजूनही हा माणूस विमानतळावरच राहतो हे विशेष! आता विमानतळाचा एक कोपराच त्याचे घर झाले आहे. 2008 मध्ये बायकोसोबत कडाक्याचं भांडण झाल्यानंतर त्याने आपलं घर कायमचं 
सोडलं. विमानतळावरचा एक चांगला कोपरा निवडून तिथेच आपलं बस्तान मांडलं.
इथे विजेवर चालणारी छोटीशी शेगडीही त्याने घेतली आहे. त्यामुळे तिथेच तो स्वयंपाक करतो आणि झोपतोही. त्याला दरवर्षी सरकारकडून ठराविक रक्‍कमेचं अनुदान मिळतं. त्यात त्याचा खर्च आरामात भागतो. जेव्हा काही आवश्यक वस्तू आणायच्या असतील तरच तो विमानतळावरून बाहेर पडतो. अर्थातच विमातळावरील कर्मचार्‍यांनी अनेकदा त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; पण त्यामध्ये त्यांना अपयशच आले. विमानतळावरचा सुरक्षा बंदोबस्त कडक असला की वेई तात्पुरतं आपलं बस्तान दुसरीकडे हलवतात. पण दोन-चार दिवस झाले की पुन्हा ते विमानतळावर येतात. त्यामुळे इथल्या कर्मचार्‍यांना देखील विमानतळावरील या नावडत्या पाहुण्याची सवय झाली आहे!

No comments:

Post a Comment