गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपने विजय मिळविला असून, मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. या विजयानंतर भाजपवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात येत आहे.
फडणवीस म्हणाले, की या निकालामुळे दिसून आले की देशातील जनता मोदींच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. देशाला माहिती आहे, भाग्य बदलण्यासाठी आपल्याला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. 22 वर्षांनंतरही लोकांचा मोदींवर विश्वास आहे. गुजरात आणि हिमाचलमध्ये अभूतपूर्व विश्वास नागरिकांनी मोदींवर टाकला आहे. गुजरात आणि हिमाचलमधील नागरिकांचे अभिनंदन करतो. कोणीही काहीही विष पेरलं तरी त्यांना लोकांनी त्यांना मोठी चपराक दिली.

No comments:
Post a Comment