शताब्दी वर्षात समाजोपयोगी उपक्रमाची शृंखला
रिसोड(रवि अंभोरे)
लॉयन्स क्लब ऑफ रिसोड मिडटाऊन च्या वतीने भव्य रोगनिदान व उपचार शिबिर दि १७ डिसेंबर रविवारला स्थानिक श्री शिवाजी विद्यालय रिसोड येथे घेण्यात आले.
आंतरराष्ट्रीय लॉयन्स क्लबचे हे शताब्दी वर्ष असून यावर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून क्लब च्या माध्यमातून जनसेवा करण्यात येत आहे.रिसोड अध्यक्षपदाची जबाबदारी ऍड किरणराव सरनाईक यांचे कडे आली तेव्हापासून सातत्याने लोकोपयोगी उपक्रमाची शृंखला सुरू आहे.त्यांच्या कारकिर्दीत शताब्दी वर्ष असल्यामुळे १५ऑगस्ट ला १०० वृक्षांची लागवड रिसोड तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.लोकांच्या आरोग्याच्या
दृष्टीने व देशाच्या आर्थिकबचत व्हावी म्हणून सायकल क्लब ची स्थापना करून १४ सप्टेंबरला भव्य सायकल रॅली काढण्यात आली ऍड किरणराव सरनाईक यांनी स्वतः सायकल चालवून शालेय विद्यार्थी व सहभागी सायकलस्वारांना प्रोत्साहन दिले व त्यामुळे आजही
अनेक नागरिक नियमित सायकल चालवितात तर दि १७ डिसेंबर च्या शिबिरात हजारो रुग्णांनी नोंदणी केली. तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून उपचार केला.रुग्णांना मोफत औषधीसुद्धा आयोजकांकडून पुरविण्यात आली.शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लब ऑफ रिसोड मिडटाऊन चे अध्यक्ष ऍड किरणराव सरनाईक तर उदघाटक लॉयन्स क्लबचे जिल्हा अध्यक्ष लॉडॉ.संजयजी वोरा,प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ सिद्धार्थ देवळे,डॉ.शिवाजी सावळे,डॉ संतोष भांडेकर,डॉ गुरुप्रितसिंग शेट्टी, डॉ रविंदरकौर.शेट्टी,डॉ.सुनील झनक,डॉ आशिष बिदरकर,डॉ भरत पटोकार,डॉ सिकची, डॉ तायडे,डॉ दिलीप धोपे,सचिव डॉ अभय गुंगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ऍड किरणराव सरनाईक यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, लोकहिताचे व देशहिताचे कार्यक्रम क्लबच्या माध्यमातून राबविले जात आहेत रुग्णांची व मानवाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ही सेवा तज्ञ डॉक्टरांकडून होत असल्याने रिसोड लॉयन्स क्लब सर्व डॉक्टरांचा ऋणी आहे त्यांनी सर्व डॉक्टर्स व सहयोगी सहकाऱ्यांना धन्यवाद दिले व शताब्दी वर्षात होणाऱ्या कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वीतेकरिता लॉयन्स क्लब रिसोड चे सर्व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कर्मचारी व डॉ विजयप्रसाद तिवारी,डॉ संतोष सोनुने,डॉ माधव मस्के,डॉ.तायडे,पत्रकार प्रभाकर पाटील, कमलकाका बगडे,संतोषभाऊ वाघमारे,पत्रकार रवि अंभोरे,
प्रा. मडके, प्राचार्य प्रतापराव नायक, प्राचार्य सुधाकर वानखेडे, डॉ अभिषेक तिवारी,प्रा कल्पना वानखेडे, प्रा दादाराव देशमुख,अशोकराव देशमुख, प्रा.अ ना देशमुख, प्रा.आरिफ,डॉ रामानंद गट्टानी,अंकुश भिसडे, ढेंगळे सर,संतोषभाऊ वाघमारे, प्रा पंढरीनाथ चोपडे, प्रा.संजय धांडे, इत्यादींनी परिश्रम घेतले

No comments:
Post a Comment