व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 3 December 2017

मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का, ओवेसींचा सवाल

कोणत्या आधारावर भागवत अयोध्येतच राम मंदिर उभारण्याचा दावा करत आहेत

मोहन भागवत काय सरन्यायाधीश आहेत का? ते कोण आहेत, अशा शब्दांत त्यांनी भागवतांवर शाब्दिक प्रहार केला.

राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारण्यात येईल या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दाव्यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. कोणत्या अधिकाराने मोहन भागवत अयोध्येत मंदिर उभारणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत काय सरन्यायाधीश आहेत का? ते कोण आहेत, अशा शब्दांत त्यांनी भागवतांवर शाब्दिक प्रहार केला.
कर्नाटकच्या उडपी येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत भागवत यांनी राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारणार असल्याचे म्हटले होते. राम मंदिरच्या वर एक भगवा झेंडा फडकेल. राम जन्मभूमीवर दुसऱ्या कशाचेही बांधकाम उभारले जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले होते

With what authority is Mohan Bhagwat saying that a Temple will be built in Ayodhya? The case is still on in the Supreme Court. Is Mohan Bhagwat the Chief Justice? Who is he?: Asaduddin Owaisi

दरम्यान, ५ डिसेंबर रोजी अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशात मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ओवेसींनी ही भागवत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मग कोणत्या आधारावर भागवत अयोध्येतच राम मंदिर उभारण्याचा दावा करत आहेत, असे ओवेसी म्हणाले. दोन्ही बाजूच्या सहमतीने तोडगा काढा असा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिल्यानंतर विविध स्तरातून याबाबत प्रस्ताव देण्यात आले आहेत. नुकताच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांनीही अयोध्येत जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर शिया वक्फ बोर्डनेही अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला. अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊत मशीद उभारावी असा प्रस्ताव त्यांनी सादर केला. मशिदीला शासकाचे नाव देण्याऐवजी ‘मस्जिद-ए-अमन’ असे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता

No comments:

Post a Comment