व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 21 December 2017

यवतमाळात लवकरच सुरू होणार कृषी महाविद्यालय : राज्यपाल राव


यवतमाळ - विदर्भात सुरू झालेले हे पहिले शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे. त्यापाठोपाठ आता मी याआधी बोलल्याप्रमाणे लवकरच यवतमाळ येथे शासकीय कृषी महाविद्यालयही सुरू होईल अशी ग्वाही राज्याचे महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिली. येथील शासकीय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सुसज्ज वास्तुचे बुधवारी दुपारी वाजता त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी कृषी फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, सफाई कर्मचारी संघटनेचे रामोजी पवार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले मंचावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी भरीव काम केले आहे. गत काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. बदलत्या हवामानाचा खूप मोठा परिणाम कृषी, अन्नधान्य आणि ग्रामीण जीवनावर पडला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही राज्य आणि केंद्र सरकारची पहिली प्राथमिकता आहे.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये शिक्षण घेण्याची विद्यार्थी आणि संशोधकांना एक चांगली संधी आहे. केवळ पारंपरिक शेती किंवा उपाययोजना करून चालणार नाही. तर त्यासाठी जैवतंत्रज्ञान आणि सुक्ष्म तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. आपल्या कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना दिलासा देणारे संशोधन होईल. तसेच बियाणे आणि खते शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून दिले जाईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र हे फलोत्पादनात अग्रणी असलेले राज्य आहे. या फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग असले की त्यातून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी सामूहिक शेती करावी. तसेच जोडधंदा म्हणून पुरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमध्ये नियमित संवाद व्हावा. तसेच राज्य सरकार, कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यात नियमित संवाद राहिला की कृषी क्षेत्राचे निश्चित ध्येय आपण गाठू शकतो, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी राज्यपाल यांच्या हस्ते फित कापून महाविद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. विलास भेले यांनी केले. संचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी तर आभार डॉ. आर.एम. गाडे यांनी मानले. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक छगन वाकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुकाअ दीपक सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, कृषी विद्यापीठाचे डॉ. व्ही.के. खडसे, डी.एम. मानकर, कुलसचिव डॉ. पी.आर. कडू, अधिष्ठाता डॉ. एम.बी.नागदेवे शेतकरी यावेळी उपस्थित होते.
या सत्रापासूनच कृषी महाविद्यालयास प्रारंभ
या कार्यक्रमादरम्यान कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, यवतमाळचे वैभव वाढविणारी ही वास्तु आहे. अतिशय वेगाने या महाविद्यालयाचे काम झाले असून अत्याधुनिक शेतीशास्त्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात या महाविद्यालयाची भूमिका महत्वाची राहणार आहे. शेतीला कौशल्याची जोड मिळाल्याशिवाय शाश्वत विकास होऊ शकत नाही. या महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होईल तसेच त्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल. त्यासोबतच या ठिकाणी सुरू होणाऱ्या कृषी महाविद्यालयाची सुरुवात येत्या सत्रापासूनच करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी राहणार महाविद्यालयाचे महत्व
याप्रसंगीपालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे भूमीपूजन आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाली. राज्य शासनाने या महाविद्यालयासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यवतमाळ हा कापसाची ओळख असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात लक्ष १५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल करण्यासाठी तसेच त्यांना समाजात ताठ मानेने उभे राहण्यासाठी या महाविद्यालयाचे महत्व आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना अतिरिक्त १२ टक्के गुण देऊन येथे प्रवेश देण्यात येतो, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment