पुणे- कोंढवा परिसरात एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी तरुणीला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर दृष्कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार आहे.
घरामध्ये वाद झाल्याने पीडित तरुणी काल (गुरुवारी) रात्री उशिरा घरातून बाहेर पडली होती. आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी ती रिक्षात बसली. तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाने तिला एका निर्जनस्थळी नेले. नंतर आपल्या दोन मित्रांना बोलावून तिच्यावर तिघांनी आळीपळीने सामूहिक अत्याचार केला.

No comments:
Post a Comment