भागलपूर - बिहारच्या भागलपूरमध्ये नकली बासमती तांदूळ आणि चुरी बनवण्याचा अवैध धंदा समोर आला आहे. जगदीशपूर आणि रजौन ब्लॉकमध्ये मिळालेल्या 30 रुपये किलोने विकणारे साधे तांदूळ फक्त दीड रुपयांची पावडर मिसळून ते 100 रुपये किलोने विकण्यात येत आहे. पश्चिम बंगाल, पाटणा, दिल्ली आणि रांचीचे हे 'बिझनेसमन' हे तांदूळ घेऊन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरातसह पूर्ण देशभरात सप्लाय करत आहेत.
असा आहे गोरखधंदा...
- बिहारमध्ये भेसळ केल्यानंतर साधे तांदूळ चुरी आणि बासमतीच्या नावाने विकण्यात येत आहेत.
- ईस्टर्न बिहार चेंबर ऑफ कॉमर्स भागलपूरनुसार, येथून दर महिन्याला 3000 क्विंटल बासमती आणि 5000 क्विंटल चुरीचा तांदूळ एक्स्पोर्ट होत आहे, तर बासमती धान येथे पिकत नसूनही हा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी 70 कोटींची काळी कमाई या बिझनेसशी निगडित महाभाग करत आहेत.
असा बनतो नकली बासमती...
- बासमतीच्या लांब दाण्यांसाठी लांब असणारे सामान्य तांदळाचे वाण उदा. सीता भार, सौरभ सीता आणि डंकल आदी घेतले जातात.
- जर चुरीचा तांदूळ बनवायचा आहे, तर त्याच्याशी मिळतेजुळते छोटे दाणेवाले सोभान आणि सोनम धान घेतले जाते. हे सर्व तांदूळ 26 ते 30 रुपये प्रतिकिलोने बाजारात मिळतात.
- धान पाण्याच्या टाक्यांमध्ये गरम पाण्यात भिजवतात.
- या टाक्यांत सुगंधित पावडर मिसळण्यात येते.
- ओले धान काढून बॉयलरमध्ये टाकले जाते.
- यातून तयार झालेले तांदूळ पूर्णपणे बासमतीसारखा सुवास देते.
(रजौन येथील एका मिल मालकाने सांगितल्यानुसार...)
प्रश्न : सर्व प्रकारच्या तांदळापासून बासमती आणि चुरीचा तांदूळ बनवता येईल काय? किती खर्च येतो?
- तांदळाची ग्रेडिंग होते. फक्त योग्य आकार मिळाला पाहिजे, मग तुम्ही पाहिजे ते बनवू शकता. 1500 रुपये किमतीच्या एक किलो पावडरने 1000 किलो सुगंधित तांदूळ तयार होतो.
प्रश्न: सुगंधित तांदूळ तयार करण्यासाठी कोणती पावडर वापरतात?
- आम्ही तर 400 ते 500 प्रकारचे सुगंधांचे पावडर बनवतो. तुम्हाला जे पावडर पाहिजे, ते घ्या!
प्रश्न: पावडरचा वापर दुसऱ्या एखाद्या धान्यातही करता येतो का?
- आम्ही तर फक्त फ्लेव्हर देतो, आणि रेसिपी विकतो. हे पावडर मिठाई, फास्ट फूड, सॉस, चॉकलेट यातही मिसळले जाते. पॅकिंगच्या नियमानुसार पॅकेटवर अॅडेड फ्लेव्हर लिहिले पाहिजे, पण तुम्ही हे लिहिणार नाहीत. खरे तर ही गडबड कुणालाच कळत नाही.
(जगन इंडस्ट्रीज, दिल्लीचे मालक ईश्वर शर्मा यांच्याशी फोनवर झालेली बातचीत)
समजून घ्या नफेखोरीचा खेळ...
- डंकल, सौरभ सीता आणि सीता सार धानाची किमंत 26 ते 30 रुपये प्रतिकिलो आहे. यात सुगंधित पावडर मिसळून मालक याला बासमती बनवतात.
- या पद्धतीने बनणारा नकली बासमती बाजारात 70 ते 100 रुपये प्रति किलो दराने खपवला जातो.
- याच प्रकारे 30 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध सोभान आणि सोनम धान चुरीमध्ये बदलून 70 ते 100 रुपये किलोने विकण्यात येत आहे.


No comments:
Post a Comment