व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 20 December 2017

छोटा शकीलच्या मृत्यूची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा हस्तक मानला जाणारा छोटा शकील याचा मृत्यू झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. शकीलच्या मृत्यूच्या बातम्या सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याने अंडरवर्ल्डमध्ये खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या हाती छोटा शकीलच्या संभाषणाची एक सीडी आली आहे. या सीडीमध्ये छोटा शकीलच्या मृत्यूचे वृत्त आहे. अंडरवर्ल्डमधून मिळालेल्या माहितीनुसार, 6 जानेवारीला छोटा शकील इस्लामाबामध्ये त्याच्या काही कामासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्याला रावळपिंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
तर दुसर्‍या एका माहितीनुसार छोटा शकीलला ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनीच ठार केल्याचेही वृत्त आहे. छोटा शकीलसोबत संबंध ठेवणे ‘इसिस’ला जड जाऊ लागले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या वाटेतून त्याला दूर केल्याचेही अंडरवर्ल्डमध्ये बोलले जात आहे. दोन दिवस त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आल्याचेही समजते. त्यानंतर सी 130 या ट्रान्स्पोर्ट एअरक्राफ्टने त्याचा मृतदेह कराचीला आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. छोटा शकील त्याची दुसरी बायको आयेशासोबत कराचीतीली डीएचए कॉलनीतील फ्लॅट क्रमांक डी 48 मध्ये वास्तव्य करत होता. छोटा शकीलचा दफनविधी उरकण्यात आल्यानंतर त्याची दुसरी बायको आयेशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आल्याचेही समजते.
‘इसिस’ किंवा पोलिसांनी छोटा शकीलचा मृत्यू झाला असल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही. तसेच भारतातील सुरक्षा यंत्रणांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तरीही छोटा शकीलचा मृत्यू झाला असल्याच्या दोन प्रकारच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. या घटनेमुळे डॉन दाऊद इब्राहिम डिप्रेशनमध्ये गेल्याचेही समजते आहे. काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

No comments:

Post a Comment