मुंबई- लोअर परळ येथील कमला मील कम्पाऊंडला आगलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 हून अधिक गंभीर जखमी झाली आहेत. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. वन अबव्ह पबमध्ये आग लागून ती संपूर्ण कम्पाऊंडमध्ये पसरली.
तपासामध्ये सहकार्य करेल; मोजो बिस्त्रो रेस्टॉरंटचा मालक सिद्धार्थ महादेवनची प्रतिक्रिया
या मिल कंपाऊंडमध्ये 3 हॉटेल्स होते. यामध्ये मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट, वन अबव आणि लंडन टॅक्सी यांचा समावेश आहे. यातील मोजो बिस्ट्रो रेस्टॉरंटमध्ये गायक सिद्धार्थ महादेवन याचे शेअर होते. यासंबंधी दिव्य मराठीशी बोलताना सिद्धार्थने सांगितले की, 'मी सध्या शहराबाहेर आहे. त्यामुळे नेमके काय घडले याबद्दल मला अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेने मला धक्का बसला आहे.'
या दुर्घटनेप्रकरणी रेस्टॉरंटच्या सुविधांवर बोट ठेवण्यात आले आहे. यासंबंधी सिद्धार्थ म्हणाला, 'नेमके काय घडले हे माहित नसल्याने याबाबत अधिक बोलता येणार नाही. सध्या ऐवढेच सांगू इच्छितो की, तपासामध्ये मी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करेल.' सिद्धार्थ हा प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकरमहादेवन यांचा मुलगा आहे.

वाढदिवशीच खुशबुला मृत्यूने गाठले...
खुशबू मेहता हिचा 28 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजो ब्रिस्टो रेस्ताँ अॅण्ड पबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दुर्दैवाने खुशबूला वाढदिवशीच मृत्यूने गाठले. पार्टीला तिचे मित्र आणि नातेवाईकही उपस्थित होते. मोठ्या थाटात वाढदिवस साजरा झाला. पण त्यानंतर आग लागली आणि पाहता पाहता हॉटेलचा सगळा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख...
कमला मिल अग्नितांडवाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली...
'कमला मिलमधील आगीत जीवितहानी झाल्याच्या घटनेमुळे दु:ख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळचे लोक गामावले आहेत माझी सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो, असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आगीच्या सखोल चौकशीचे आदेश मुंबई माहानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे.

आगीचे वृत्त धक्कादायक- राष्ट्रपती
कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीचे वृत्त धक्कादायक असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, आगीत ज्यांनी जीव गमावला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जे जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी इच्छा व्यक्त करतो.
अत्यंत दुर्दैवी घटना- राहुल गांधी
मुंबईमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे.
बहुतेकांचा मृत्यू गुदमरून...
कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात बहुतेकांचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे केईएम हॉस्पिटलचे डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले आहे. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 8 मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास वन अबव्ह पबला सुरुवातीला आग लागली त्यानंतर हॉटेल मोजेस ब्रिस्ट्रोला आणि लंडन टॅक्सी रेस्टोपबमध्ये आग पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटना घटनास्थळी पोहोचले. कुलिंग ऑफरेशन करून आगी विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास अडीच ते तीन तासांनी आग आटोक्यात आली.
जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वन अबव्ह पबच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. आगीमुळे रेस्तराँ आणि पबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये टीव्ही 9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. त्यांचेही नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील कर्मचार्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, हॉटेल मोजो ब्रिस्ट्रो पूर्णतः शाकाहारी आहे. या हॉटेलमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रमिला, तेजल गांधी (36), खुशबू बन्सल, विश्वा ललानी (23), पारुल लकडावाला (49), धैर्य ललानी (26), किंजल शहा (21), कविता धरानी (36), शेफाली, यशा ठक्कर (22), सरबजीत परेला, प्राची खेतानी (30), मनिषा शहा (47), प्रीती राजगीरा (41) अशी मृतांची नावे आहेत.

No comments:
Post a Comment