स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना चुकीने ’अपसेंट’ दाखवण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असूनही निकालात हा गैरप्रकार घडल्याने त्यांचा पीएच.डी. व पुढील शिक्षणासाठी प्रवेश धोक्यात आला आहे.
पीएच.डी. प्रवेशासाठी पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 25 जूनपासून आरएसी (रिसर्च अॅडमिशन कमिटी) मुलाखती सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या प्रकारावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस - शरदचंद्र पवार नांदेड शहर तर्फे संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी परीक्षा नियंत्रकास निवेदन देत त्यांनी चुकीचा निकाल न सुधारल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, म्हणून निकाल त्वरित दुरुस्त करावा, विद्यार्थ्यांना अधिकृत मार्कशीट देण्यात यावी आणि वारंवार घडणार्या निकाल घोळावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार नांदेड जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी, उत्तर विधानसभा अध्यक्ष अमितसिंघ सुखमणी, मोहसीन खान, मो.अर्सलान, शिवानंद वाखार्डे, युसूफ अन्सारी, योगेश शिंदे, कामरान शेख, सुमित साबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment