व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 23 June 2025

बिलोलीत शहरात विद्युत वितरणच्या विरोधात भव्य-मोर्चा व रास्ता-रोको जळीत विद्युत उपकरणाला वाहिली आंदोलकांनी श्रद्धांजली

 


#Nanded_News 

बिलोली 

बिलोली शहरासह तालुक्यात विद्युत वितरण विभागाच्या विरोधात नागरीकांत प्रंचड रोष असुन विद्युत वितरणच्या मनमानी व गलथान कारभाराविरोधात बिलोली शहरात २३ जुन रोजी भव्य मोर्चा व रास्ता-रोको आंदोलन माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले,सदर आंदोलनात अनियमित विज पुरवठ्यामुळे जळीत उपकरणाला श्रद्धांजली  वाहण्यात आली.याप्रसंगी तालुक्यातील महीला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.नरसी-डिचपल्ली राज्यमार्गावर जवळपास एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.विद्युत वितरण कंपणीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

बिलोली शहरासह तालुक्यातील जनतेला विद्युत् वितरण कंपणीच्या गलथान कारभारामुळे नागरीकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.वारंवार विजपुरवठा खंडीत होणे,अनियमित वीजपुरवठा, जास्तीचे वीजबिल,खोट्या बिलांचा ञास,शेतात तारा लोबंकळणे,विद्युत खांब तुटणे,रोहीञ नादुरुस्त होणे,कर्मचारी व अधिकारी फोन न उचलणे,अशा विद्युत् वितरण कंपणीच्या मनमानीला व अनागोंदी कारभाराला गोर-गरीब,शेतकरी व सर्वसामान्य जनता वैतागून गेली होती.त्यामुळे बिलोली शहरात माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारातुन राज्य महामार्गावरील तहसील कार्यालयासमोर भव्य रास्ता-रोको करण्यात आला. या आंदोलनात महीला व पुरुषांनी विद्युत वितरणाविरोधात घोषणा व नारेबाजी करत आपला रोष व्यक्त केला.सदर रास्ता-रोको आंदोलनात माजी नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष यशवंत गादगे,माजी नगरसेवक प्रकाश पोवाडे,शेख सुलेमान,गणेश पा.शिंपाळकर,शांतेश्वर पाटील,महेंद्र गायकवाड,भाऊ बिलोलीकर,डॉ.मनोज शंकपाळे,मुन्ना पोवाडे,मुकिंदर कुडके, सादीक पटेल,बाबु कुडके,लक्ष्मण शेट्टीवार,आखिल सिद्धीकी, दादेसाब कुरेशी, हणमंलु येंबडवार यांच्यासह शहरातील व ग्रामीण भागातील नागरीकांची मोठी उपस्थिती होती.यावेळी तहसिलदार गजानन शिंदे,विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचा-यांनी लेखी आश्वासनाचे पञ आंदोलनकर्त्याला देऊन शहरातील वारंवार होणारा विजेचा लपंडाव,मान्सुनपुर्व पुर्वरत करणे,नियोजित लाईट-बिला संदर्भात 'बिल दुरुस्ती कॕम्प' घेणार असल्याचे तसेच बिलोली शहरातील नागरीकांकरीता ७८७५७१२५३२ हा क्रमांक उपलब्ध करुन दिला असल्याचे लेखी पत्र संतोष कुलकर्णी यांना दिले.यावेळी पोलीस निरिक्षक अतुल भोसले यांनी चोख पोलीस बंदोबस्त बजावला होता.


चौकट

----------------------------------------

उपजिल्हा रुग्णालया विरोधात आंदोलनकर्त्याचा संताप...


बिलोली शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या मनमानी व अनागोंदी कारभाराविरोधात विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला व पुरुषांनी रुग्णालयाच्या कार्यप्रणाली विरोधात संताप व्यक्त केला आहे. शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी हेळसांड होत असून कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपचार करीत नसल्याने आंदोलनकर्त्यानी संताप व्यक्त केला आहे.

----------------------------------------

No comments:

Post a Comment