गोदावरी इन फोकस या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत डॉ. अरुण मानीकर प्रथम
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
नांदेड, दि. २५:- जागतिक जलदिनाचे औचित्य साधून गोदावरी नदीच्या सौंदर्य, संस्कृती आणि पर्यावरणीय महत्त्वाचा शोध घेणाऱ्या ‘ गोदावरी इन फोकस ' या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नांदेडचे हौशी छायाचित्रकार आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अरुण मान्नीकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या स्पर्धेत त्यांनी सादर केलेले छायाचित्र गोदावरी नदीच्या परिसंस्थेचे सौंदर्य आणि तिच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे यथार्थ दर्शन घडविणारे ठरले. या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना १५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व मानपत्र देऊन, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे हस्ते गौरविण्यात आले.
त्यांच्या या छायाचित्रात नदीच्या जलसंपत्तीमुळे मानवी जीवन आणि वन्यजीव यांच्यातील पर्यावरणीय समतोल अधोरेखित झाला आहे.
जल दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेचा उद्देश गोदावरी नदीच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा होता.
ही स्पर्धा ‘गोदावरी इनिशिएटिव्ह’ या संस्थे तर्फे आयोजित करण्यात आली होती


No comments:
Post a Comment