व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 1 March 2025

परिक्षेच्या दिवशी वडिलाचे निधन..अंत्यविधी आटोपूण अश्रूनयनाने मुलाने दिला दहावीचा इंग्रजीचा पेपर..

परिक्षेच्या दिवशी वडिलाचे निधन..अंत्यविधी आटोपूण अश्रूनयनाने मुलाने दिला दहावीचा इंग्रजीचा पेपर..किनवट तालुक्यातील येथील घटना .. मुख्याध्यापकाने दिले पाठबळ 
नांदेड - राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील शेकडो परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील किनवट येथील एका परिक्षा केंद्रावर वडिलांचा अंत्यविधी आटोपुन एका विद्यार्थ्याने इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला. केवळ मुख्याध्यापकांच्या पाठबळाने तो हे करू शकला असून यातून त्याने एक प्रकारे वडीलांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. सुरज संजय जाधव असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

सुरज हा यवतमाळ जिल्हयातील उमरखेड तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील इंदिरा गांधी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा तो विद्यार्थी आहे. किनवट येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर तो परीक्षा देत आहे. दरम्यान शनिवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास सुरजचे वडील संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या डोक्यावरचे वडिलाचे छत्र हरपले. पेपरचा वेळ आणि त्यातच वडिलांची अंत्यविधी असा दुःखाचा डोंगर चढून परीक्षा द्यायची कशी ? असा तो विचार करू लागला. त्याने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही असे सांगितले. सरांनी प्रत्यक्ष त्याच्या गावी, घरी जाऊन  सुरजचे सांत्वन करत, परीक्षा देऊन तू तुझ्या बाबांना खरी श्रध्दांजली दे, आणि त्याला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन, त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात हे पटवुन सांगितले. त्यानंतर सुरज शेवटी परीक्षा द्यायला तयार झाला. वडीलांचा अंत्यविधी आटोपुन सुरजने परीक्षा केंद्र गाठले साश्रुनयनाने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली.

No comments:

Post a Comment