व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 14 March 2025

शृंगारिक कविता आणि दिव्यार्थी विनोदांची रेलचेल असलेल्या ॲड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या २५ व्या महामुर्ख कविसंमेलन नांदेड मध्ये संपन्न




शृंगारिक कविता आणि
दिव्यार्थी विनोदांची रेलचेल असलेल्या ॲड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या २५ व्या महामुर्ख कविसंमेलनात देशभरातून आलेल्या कविंनी एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्यामुळे हजारो रसिकांनी होळीचा आनंद मनसोक्त लुटला.


होलिका उत्सव समिती व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल द्वारे होळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी नवा मोंढा नांदेड येथे महामूर्ख कविसंमेलनाचे आयोजन दिलीप ठाकूर यांच्यासह डॉ.जुगल धुत, पंढरीनाथ बोकारे, सुरेश लोट हे करतात. रसिकांनी खचाखच भरलेल्या मैदानात सुरुवातीला मूर्ख शिरोमणी म्हणून मान्यता पावलेल्या दोन गर्दभ राजाचे माजी विरोधी पक्ष नेते दीपकसिंह रावत  आणि  प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंद शर्मा यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. भाजपा उपाध्यक्ष व्यंकटेश जिंदम यांनी एका तृतीय पंथीयाला विशिष्ट प्रकारचा हार घातल्या मुळे हास्याचा स्फ़ोट झाला. प्रसिद्ध व्यापारी आनंद साताळे,गुरुद्वारा बोर्ड सचिव रविंद्रसिंघ बुंगई,प्रतिष्ठित व्यापारी संजय बोधणे, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख,

भाजप उद्योग आघाडी उपाध्यक्ष शिवप्रसाद राठी,डॉ. उमेश भालेराव,डॉ. सुशील राठी, अल्पबचत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिवलाड, प्रसिद्ध उद्योजक सेवकसिंघ जहागीरदार,

नांदेड भूषण राजेंद्र हुरणे,प्रतिष्ठित व्यापारी शिवाजीराव इबितवार,प्रतिष्ठित व्यापारी नागेश शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते

संदीप अग्रवाल,प्रतिष्ठित व्यापारी सुमेर राजपुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.वाराणसी नंतर फक्त नांदेडमध्येच होळीच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.आगळ्यावेगळ्या या कविसंमेलनात हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे यांच्या उडत्या चालीवर असलेल्या विडंबन गितांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.अनिल आवारा बनारस यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे कविसंमेलनाची रंगत वाढली.मुंबईच्या विनोद सोनी आणि बालाघाट मध्यप्रदेशचे लक्ष्मीचंद ठाकूर यांनी शृंगार गीते सादर केली. उत्तर प्रदेश च्या सफर जौनपुरी यांच्या हजर जबाबी पणाला रसिकांनी दाद दिली.प्रा.रविंद्र अंबेकर यांचे विनोदी किस्से ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले.सिनेस्टार लच्छु देशमुख यांनी सहअभिनय सादर केलेल्या विनोदामुळे उपस्थिताची चांगली करमणूक झाली.वसंतराव इंगोले यवतमाळ यांनी देखील आपल्या रचनांनी रसिकांवर छाप पाडली. संयोजक दिलीप ठाकूर यांनी  संचलन करतांना प्रत्येक अतिथी व कवी यांच्यावर केलेल्या विनोदी टिपणीना हजारो श्रोत्यांनी वेळोवेळी मनमुराद टाळ्या वाजवून पसंती दर्शविली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधामुळे नाईलाजास्तव रात्री दहा वाजता कार्यक्रम बंद करण्यात आला तरी रसिकांचा वर्षभरातील हसण्याचा कोटा पूर्ण झाला.मैदानाची जागा अपुरी पडल्यामुळे उशिरा आलेल्या रसिकांना चार तास उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागला.नरेश निहलानी, राजू लालवानी, जुगलकिशोर शुक्ल यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.मनपा तर्फे वसीम तडवी, स्वच्छता निरीक्षक सतीश नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानाची स्वच्छता करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवाजी नगर पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दररोजच्या व्यस्त दिनचर्येतून सवड काढून अनेक माध्यम प्रतिनिधींनी या कविसंमेलनाचा मनसोक्त आनंद लुटला. विपिन कासलीवाल, हरिभाऊ मालपानी, कैलाश राठी, पप्पू रिजवानी 

व्यंकट मोकले, बागड्या यादव, संदीप छापरवाल, कैलास ठाकूर, अनिल जगताप यांच्या सह अनेकांनी महामूर्ख कविसंमेलनाची रजत जयंती पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले.महामूर्ख कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर,कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, सुरेश निलावार,प्रभुदास वाडेकर,जगतसिंह ठाकूर, शिवा लोट, विकास वाठोरे, प्रकाश उंटवाले,अजयसिंह परमार,धरमसिंह परदेशी, विलास जोगदंड, संतोष भारती,गौतम सावने,राहुल साउंडवाले, शिवकुमार लोट, कपिल यादव,गणेश बिरकुरे यांनी परिश्रम घेतले.वर्षभर मनातील एका कोपऱ्यात  साचलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी दिलीप ठाकूर हे गेल्या २५ वर्षापासून होळीचे अनोखे आयोजन करत असल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment