नांदेड:नवीन कौठा येथील कुशीनगर च्या साकेत बुद्ध विहारात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त इतिहास समजून घेण्यासाठी व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला असून कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते झाले अत्यंत अल्पावधीत जनतेच्या मनात घर करून विधानसभेवर आपला भगवा फडकवल्यामुळे नवीन कौठा वासीयांकडून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आमदार साहेबांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम महापुरुषांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व नवीन कौठा येथील समस्यांसाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आणि येत्या काही दिवसातच बुद्ध विहार सभामंडपाचे भूमिपूजन करू असे जाहीर केले. इतरही पाण्याचा प्रश्न असेल किंवा सार्वजनिक जे काही प्रश्न असतील ते टप्प्याटप्प्यात सोडवण्याचे आश्वासन सुद्धा आपल्या मनोगतामध्ये त्यांनी दिले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या CITU च्या राज्य सचिव कॉ उज्वला पडलवार यांनी आपले विचार मांडताना बुद्धविहाराच्या प्रांगनात शिवजयंती साजरी करून समाजाला नवीन दिशा दिली त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड संघरत्न गायकवाड यांनी नवीन कौठा येथील समस्यावर प्रकाश टाकत आ. बोंढारकत्यांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सुनील अनंतवार व विजय लव्हाळे यांनी केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल आमदार बोंढारकर व सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पराक्रमी नेतृत्वाचा आदर्श आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे, स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराजांनी समाज सुधारण्यासाठी केलेले कार्य आणि त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युवाव्याख्याते श्री. आशिष साडेगावकर, युवाव्याख्याते श्री. ऍड. कृष्णा पाटील तिडके ,नितीन नरवाडे यांनी
महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, प्रमुख पाहुणे विजय दादा सोनवणे (प्रदेश संघटक, आरपीआय, पप्पू भाऊ जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित दादा पवार गट), प्रमुख उपस्थिती,तुलजेश यादव,भास्कर हंबर्डे, सुहास पाटील खराणे, नारायण लुटे, शिवा लोट, राजेश भदर्गे व कुशीनगर भागातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद अंभोरे यांनी केले तर प्रस्ताविक सुनील अनंतवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जळबाजी सोनकांबळे,सचिन कांबळे,राहुल हैबते व नवयुवक भीम जयंती मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ च्या महिलांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे रोहन कहाळेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केली..
No comments:
Post a Comment