व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 15 January 2025

शिंदे, काकडेंचा भाजप प्रवेश;* *काँग्रेसला आणखी एक खिंडार


नांदेड, दि. १५ जानेवारी २०२५:

जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार पडले असून, माजी जिल्हा जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व गंगाप्रसाद काकडे यांच्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तसेच ग्रामीण भागातील अनेक सरपंचांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 

खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी वाजेगाव जि.प. सर्कलचे माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे, बळीरामपूर जि.प. सर्कलचे माजी सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्यासह काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे अनेक सरपंच, माजी सरपंच, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. महाविकास आघाडीतून सध्या मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु असून, शिंदे, काकडे देखील महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. ते नेमके कोणत्या पक्षात जाणार, याविषयी वेगवेगळे कयास लावले जात असताना त्यांनी आज भाजप नेते व माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी नगरसेवक बालाजी जाधव, अमित तेहरा , राजू पाटील काळे, संजय मोरे, उदय देशमुख, सिद्धार्थ गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात गोपाळ चावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलुकर, धनेगावचे सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे, बाभुळगावचे सरपंच पुंडलिक मस्के,वांगीचे सरपंच दता पाटील जाधव,पिंपळगाव मिश्रीचे सरपंच माधव‌ पाटील पुयड,कल्हाळचे विठ्ठल कळके, पांगरीचे हनमंत ‌घोगरे,गाडेगावचे संदीप धुमाळे, माजी सरपंच मारोतराव संगेकर, आनंदराव अवातिरक माजी सरपंच सिद्धनाथ , वांगीचे माजी सरपंच गोविंदराव जाधव,पंचायत समिती सदस्य गंगाधर नरवाडे, बबु्वान‌ उपसरपंच खडकुत, नागोराव जाधव माजी उपसरपंच वांगी,बबन‌ मेकाले माजी उपसरपंच पांगरी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी सतिश बस्वदे,रमेश तालीमकर, चिमणाजी पाटील कदम, राजेश बोटलावार, शंकर‌ शिंदे, गंगाधर देशमुख, राष्ट्रवादीचे गंगाधर कवाळे‌ यांनी भाजपात प्रवेश केला.

No comments:

Post a Comment