व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 3 January 2025

माळेगाव यात्रेत विविध शासकीय योजनेचे स्टॉलजिल्हा परिषदेचा उपक्रम; नागरिकांकडून प्रतिसाद


माळेगाव यात्रेत विविध शासकीय योजनेचे स्टॉल
जिल्हा परिषदेचा उपक्रम; नागरिकांकडून प्रतिसाद
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा (मीडिया सेंटर),  4 जानेवारी- माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविकांना देवदर्शन, मनोरंजन आणि खरेदी विक्रीचा आनंद लुटण्याबरोबरच जिल्हा परिषद प्रशासनाने शेतकरी, पशुपालक, शिक्षण, आरोग्य स्वच्छता,  महिला बाल विकास, समाजकल्याण आदी विभागांचे स्टॉल उभारले आहेत.  या स्टॉल मधून विविध शासकीय योजनांची माहिती अधिकारी व कर्मचारी देत आहेत. 
          कृषी व पशु प्रदर्शन तसेच इतर स्टॉलचे उद्घाटन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी यांची यावेळी उपस्थित होती.  माळेगाव यात्रेत भाविकांसाठी प्रदर्शन व माहितीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. कृषी प्रदर्शनात शाश्वत शेतीचे उपयोगासाठी पीक पद्धतीचे तंत्रज्ञान, जलसंधारण पद्धती, फळ पिकांचे उत्पादन, भाजपाला उत्पादन, आंतरपीके आदी नवतंत्रज्ञानाबाबतची माहिती दिली जात आहे.  तसेच येथे विविध कंपन्यांचे शेतीला लागणारे अवजारे यांची माहिती देणारे स्टॉल उभारले आहेत. 
       जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व आरोग्यसेवांची सचित्र माहिती उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, जमिनी सुरक्षा, शिशु योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम, गर्भलिंग निदान कायदा, आयुष्यमान कार्ड आदी बाबतची माहिती या स्टॉल मधून यात्रेकरूंना दिली जात आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार देखील केले जात आहेत. येथे कलापथकाच्या माध्यमातूनही शाहीर जोंधळे आरोग्यविषयक जनजागृती करत आहेत.
         जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेत महिला व बालकांच्या विविध योजनेसह पोषण आहाराबाबत स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध पौष्टिक व पोषण आहाराचे पदार्थ बनवून ठेवण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी केंद्राची प्रतिकृती उभारून अंगणवाडीचे प्रत्यक्ष चित्रण येथे भाविकांना सांगितले जात आहे अंगणवाड्यांमधून बालकांवर केले जाणारे संस्कार व आहाराविषयी माहिती दिली जात आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती दारूबंदी याविषयी जनजागृती स्टॉल व कलापथकाद्वारे प्रबोधन केले जात आहे. या सर्व स्टॉललाही याञेकरु भेट देत आहेत.

No comments:

Post a Comment