मुखेड / प्रतिनिधी.
शेर-ए-म्हैसुर हजरत टिपू सुलतान यांची जयंती दिनांक ०३ डिसेंबर रोजी मुखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाची सुरुवात हाजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शेर ए म्हैसुर हाजरत टिपु सुलतान यांच्या जयंतीनिमीत्त रात्री कार्यक्रम संपल्यानंतर अन्नदान करण्यात आले.सदर कार्यक्रमाची सुरुवात टिपु सुलतान यांच्या प्रतिमेसह महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन ढोल ताशेच्या गजरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी मुखेड पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक केंद्रे व जयंती अद्यक्ष अब्दुल सय्यद , उपाध्यक्ष बाबू बागवान,शबीर बलखी, एस के बबलु,शौकत होनवडजकर, खदीर शेख यांच्या वतीने हजरत टिपु सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
पोलिस सहायक निरीक्षक तिडके,पोलिस उपनिरीक्षक चव्हाण,पोलीस पाटील,पोलीस शिपाही यांचा चोख बदोबस्त होता
या वेळी ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपनवाड, सचिव इब्राहिम चाऊस, कार्याध्यक्ष आसद बल्खी, कोषाध्यक्ष समीर बद्रू शेख, प्रसिद्धी प्रमुख इमरान अत्तार सदस्य, पत्रकार महेताब शेख, रऊफ मुल्ला, गौस पठान,अलीम शेख, हारून होंनवड़जकर, पत्रकार बबलु मुल्ला,शेख जिलानी, शेख बबलू, मुनवर शेख,मोबीन बल्खी, सोहेल शेख,सोहेल सय्यद,यासीर शेख,अदनान पाशा जेष्ठ नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment