व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 24 December 2024

श्री क्षत्रिय समाज संस्थेच्या निवडणुकीसाठी आजीवन सभासदांचे ठिय्या आंदोलन


नांदेड (प्रतिनिधी)- श्री क्षत्रिय समाज संस्था (रजि.)एफ-11 नांदेड या विश्वस्त संस्थेची त्वरित निवडणूक जाहीर करावी या मागणीसाठी संस्थेच्या आजीवन सभासदांच्यावतीने मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
संयुक्त धर्मादाय आयुक्त औरंगाबाद-नांदेडच्या आदेशानुसार संस्थेची तात्काळ निवडणूक जाहीर करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वीच संस्थेच्या आजीवन अकरा सदस्यांनी अध्यक्ष व सचिवांना निवेदन सादर केले होते.तरीही निवडणूक जाहीर न केल्यामुळे ढोल-नगाडे वाजवून व ठिय्या आंदोलन करून या मागणीकडे लक्ष्य वेधण्यात आले. आंदोलनानंतर अध्यक्ष-सचिवांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की,श्री क्षत्रिय समाज रजि. एफ-11, नांदेडचे 11 आजीवन सभासदांनी सहा. धर्मदाय आयुक्त यांचे आदेशाचे समाजाकडून समन्वय राखत आदराने त्वरीत निवडणूक जाहीर करण्यात येईल असे संस्थेकडून अपेक्षीत होते. परंतु संस्थेची निवडणूक घेण्यास विलंब केला जात आहे. संस्थेच्या घटने नियमानुसार दर वर्षी सर्वसाधारण सभा घेण्यात यावी असे बंधनकारक असतांना तब्बल 7 वर्षांत केवळ एकच सर्वसाधारण सभा घेण्यात आली, घटनेनुसार पांच वर्षात निवडणूक घेण्याची तरतुद आहे. परंतु सातवे वर्ष संपत आले असतानाही संस्थेची घटनेप्रमाणे निवडणूक अद्यापीही झालेली नाही.सदरील कारभाराची संपुर्ण जबाबदारी ज्या पद्धतीने विश्वस्त कार्यकरिणीची असते त्याच पद्धतीने घटने नुसार आजीवन सभासदांची सुद्धा तेवडीच जबाबदारी असते. त्याला नाकारता येत नाही, त्यामुळे नाईलाजास्तव हे ठिय्या आंदोलन करणे भाग पडले. या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा आणि मोलाचे सहकार्य करावे, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. या ठिय्या आंदोलनात संदीपसिंह नागराजसिंह काथी,बरजोरसिंह भिक्कमसिंह गहेरवार,मोहनसिंह दौलतसिंह कच्छवा, विजयसिंह रामकिशनसिह काथी,प्रल्हादसिंह भिक्कमसिंह बैस, रणविरसिंह केसरीसिंह गंगावंशी,तारासिंह गोविंदसिंह कौशिक,मनोजसिंह रघुनाथसिंह ठाकूर, माधवसिंह चरणसिंह परमार,विनोदसिंह राजुसिंह परिहार, विजयसिंह धरमसिंहg लौना या आजीवन सभासदांसह अनेक समाजबांधवांनीही सहभाग घेतला होता. या ठिय्या आंदोलनाला समाज बांधवांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment