6 डिसेंबरच्या अभिवादनासाठी नांदेडहून मुंबईला विशेष रेल्वे सोडा : रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांची मागणी
नांदेड : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भीमा अनुयायी मुंबईला जात असतात . त्यामुळे सहा डिसेंबरसाठी नांदेड येथून मुंबईसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले होते . त्यानंतर दरवर्षी सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून भीम अनुयायी मुंबई येथे जात असतात. नांदेड जिल्ह्यातील हजारो भीम सैनिक दरवर्षी मुंबईकडे रवाना होतात परंतु भीमयोध्यांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेडहून मुंबईला जाण्या - येण्यासाठी रेल्वेच्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. हि बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नांदेड इथून दिनांक ४ आणि ५ डिसेंबर रोजी आणि परतीच्या प्रवासात ७ आणि ८ डिसेंबर रोजी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्यासह ऍड. सुमंत लाटकर, रवी हडसे, अमर जोंधळे, सागर देशमुख गुलाब अवधूते, प्रीतम थोरात, अजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. छाया.
No comments:
Post a Comment