व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 12 November 2024

हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवरसकरांना एकदा संधी द्या – छत्रपती संभाजीराजे

 



हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी आता पारंपरिक राजकीय गुलामगिरी नाकारून नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार माधवराव देवरसकर यांच्या प्रचार सभेत नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या सभेत देवरसकर यांच्या नेतृत्वात सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला.


संभाजीराजे म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांत पारंपरिक राजकारण्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. आता बदल आवश्यक असून, शेतकरी व सामान्य नागरिकांनी नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी." यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला.


माधवराव देवरसकर यांनी हदगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी झगडण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे त्यांना स्थानिक नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

No comments:

Post a Comment