नांदेड जिल्ह्यात तिसऱ्या आघाडीने एंट्री घेतली असून नायगाव मतदार संघात सुद्धा उमेदवारी घोषित करण्यात आली. तिसऱ्या आघाडीच्या एंट्री ने प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांची झोप उडाली आहे. काँग्रेस अन भाजप प्रमुख दोन पक्षात निवडणूक होत असताना तिसऱ्या आघाडीने एंट्री करून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
29 ऑक्टॉबर रोजी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी भाजप, काँग्रेस अन तिसऱ्या आघाडीने सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तिसऱ्या आघाडीचे उमेदवार गजानन चव्हाण यांनी माजी आमदार सुभाष साबणे यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे सुपूर्त केला.
तिसऱ्या आघाडीचे नेते छत्रपती संभाजीराजे, बच्चूभाऊ कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकर आणा धोंडगे, नारायण अंकुशे यांच्या आशीर्वादाने आपल्याला तिसऱ्या आघाडीचे तिकीट मिळाले असून दिव्यांग, विधवा,निराधार, शेतकरी, शेतमजूर सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठी आपण लढणार असल्याचे मत गजानन चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. उपस्थित अर्ज करताना प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख पंढरीनाथ हुंदेकर, जिल्हा सचिव मारुती मंगरूळे, गजानन तमलूरे, साईनाथ बोईनवाड चक्रधर हंबर्डे, साईनाथ जूंनीकर, हनुमंत देसाई, सोनटक्के धर्माबादकर, योगेश हंबर्डे, महादेव हंबर्डे, विजय कदम, दीपक हंबर्डे चंद्रकांत हंबर्डे बालाजी हंबर्डे बळवंत कदम संजय हंबर्डे विठ्ठल बोरीकर अंगत मुदखेड अशोक पवार माधव चव्हाण गणेश देगावे शेख मुजाहिद श्रीनिवास देगावे सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनता जनार्दन उपस्थित होते
तिसऱ्या आघाडीच्या एंट्रीने नायगाव मतदारसंघात होणार तिरंगी लढत.
नायगाव मतदार संघात भाजप कडून राजेश पवार यांना, काँग्रेस कडून मिनल खतगावकर यांना तर तिसऱ्या आघाडीकडून गजानन चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून यामुळे आता नायगाव मतदार संघाची निवडणूक तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे.
No comments:
Post a Comment